Indian Railways: रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आणले 'बुरे दिन', तिकीटातील सवलत बंद

रेल्वेला (Indian Railways) भारतात जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात.
Indian Railways
Indian Railways
Published on
Updated on

रेल्वेला भारतात जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने प्रवास करतात. आता रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाईट बातमी आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात अतिरिक्त सवलत देण्याची सुविधा सध्या सुरु केली जाणार नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी संसदेत स्पष्ट केले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणे भाड्यात अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, 2020 मध्ये, कोरोना महामारी (Corona Eidemic) आल्यानंतर संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने आपल्या अनेक सेवा बंद केल्या होत्या. यानंतर हळूहळू अनेक सेवा पूर्ववत झाल्या, मात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या प्रवासात अतिरिक्त सवलतीची सुविधा पुन्हा सुरु झाली नाही. बुधवारी संसदेत, रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, सरकार सध्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांमध्ये अतिरिक्त सवलत देणार नाही.

Indian Railways
Indian Railways: ...आता स्वत: पोलिस पोहचणार प्रवाशांच्या सीटपर्यंत'

केवळ 3 श्रेणीतील लोकांना अतिरिक्त सवलतीची सुविधा मिळतेय

लॉकडाऊननंतर, जेव्हा रेल्वेने आपली सेवा पुन्हा सुरु केली, तेव्हा केवळ 3 श्रेणीतील लोकांना रेल्वे तिकिटांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही श्रेणी दिव्यांग, विद्यार्थी आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 11 रुग्णांसाठी आहे.

Indian Railways
Indian Railways New Rules 2022: शिक्षेपासून वाचायचे असेल तर 'या' नियमांचे करा पालन

रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा पुन्हा सुरु न करण्यामागचे कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे रेल्वेच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वेची कमाई जवळपास थांबली होती. यानंतर, रेल्वे ऑपरेशन सुरु झाल्यानंतरही, लॉकडाऊनच्या (Lockdown) तुलनेत रेल्वेच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com