Modi Govt Scheme: जर तुम्ही स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, मोदी सरकार घर खरेदीदारांसाठी नवीन होम लोन अनुदान योजना (New Modi Govt Home Loan Subsidy Scheme) सुरु करण्याचा विचार करत आहे. योजनेतर्गंत, शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील सुमारे 25 लाख लोन अर्जदारांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मोदी सरकार लवकरच अशा योजनेची घोषणा करु शकते. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा घरांच्या मागणीवर अनुदानाची रक्कम अवलंबून असेल.
चला मग जाणून घेऊया शहरी अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ही योजना काय आहे? या योजनेवर पुढील 5 वर्षांत सुमारे 60,000 कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची (Government) योजना आहे.
छोट्या घरांसाठी ही योजना सरकार येत्या काही महिन्यांत सुरु करु शकते, असा दावा या अहवालात केला जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी एका नवीन योजनेद्वारे, शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना स्वस्त होम लोम उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती.
पीएम मोदी म्हणाले होते की, त्यांचे सरकार एक नवीन योजना घेऊन येत आहे, ज्याचा फायदा अशा कुटुंबांना मिळेल जे शहरांमध्ये भाड्याच्या घरात, झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहतात. मात्र, या योजनेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
रॉयटर्सच्या मते, नवीन योजनेतर्गंत, अर्जदारांना 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर 3 ते 6.5% दरम्यान वार्षिक व्याज अनुदान मिळू शकते.
अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या 50 लाख रुपयांपेक्षा कमी होम लोनवर ही सबसिडी मिळणे अपेक्षित आहे. सरकारने दिलेल्या व्याज सवलतीचा लाभ लाभार्थ्यांच्या होम लोन खात्यात जमा करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, आराखड्याला अंतिम स्वरुप देण्याची तयारी सुरु असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. ही योजना सरकारने सुरु केल्यास त्याचा थेट फायदा शहरांमध्ये राहणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.