Modi Government: मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली आनंदाची बातमी, उसाच्या एमएसपीमध्ये भरघोस वाढ!

Modi Government: मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Modi Government: मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आता मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. वास्तविक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.

याअंतर्गत केंद्रीय मंत्रिमंडळाने उसाच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात प्रति क्विंटल 10 ते 315 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना फायदा

सरकारच्या या घोषणेचा फायदा शेतकऱ्यांना (Farmer) होणार आहे. ठाकूर म्हणाले की, "कॅबिनेटने 2023-24 च्या साखर हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 315 रुपये या आतापर्यंतच्या सर्वात रास्त आणि माफक भावाला मंजूरी दिली आहे.

या निर्णयामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना फायदा होईल.''

Prime Minister Narendra Modi
Modi Government: पासपोर्टशी संबंधी मोठी घोषणा, 'या' नवीन आणि खास सुविधा देणार सरकार!

उसाची एफआरपी निश्चित

ऊस उत्पादकांना हमी भाव मिळावा यासाठी उसाची एफआरपी निश्चित केली जाते. त्यामुळे साखर कारखानदार नफ्यात राहतील की तोट्यात राहतील याचा विचार केला जात नाही.

विश्लेषकांचे मते, जास्त एफआरपी सहसा साखर कारखान्यांच्या मार्जिनवर परिणाम करत नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांक गाठत असतानाही साखर उद्योगातील बहुतांश समभाग नकारात्मक क्षेत्रात व्यवहार करत आहेत.

Prime Minister Narendra Modi
Modi Government: मजूरांसाठी मोदी सरकारने उचलली पावले; मंत्री म्हणाले, 'कामगार क्षेत्रातील भेदभाव दूर करण्यासाठी....'

यापूर्वीही दरात वाढ करण्यात आली होती

त्याचवेळी, सरकारने (Government) गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विपणन वर्ष 2022-23 साठी ऊस उत्पादकांना कारखान्यांद्वारे द्यावयाच्या किमान भावात 15 ते 305 रुपये प्रति क्विंटल वाढ केली होती.

सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर कारखानदार आणि संबंधित अनुषंगिक कामांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 5 लाख कामगारांना फायदा होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com