Modi Government: मजूरांसाठी मोदी सरकारने उचलली पावले; मंत्री म्हणाले, 'कामगार क्षेत्रातील भेदभाव दूर करण्यासाठी....'

e-Shram Portal: प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी मोदी सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत. यात नोकरदार वर्गाचाही समावेश आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

Modi Government on Eshram Portal: मोदी सरकारने गरीब वर्गासाठी अनेक पावले उचलली आहेत. याशिवाय, प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी मोदी सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत. यात नोकरदार वर्गाचाही समावेश आहे.

मोदी सरकारने मजुरांसाठीही अनेक योजना राबवल्या आहेत. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, मोदी सरकारने कामगार क्षेत्रातील भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

भेदभाव संपवण्यासाठी प्रयत्न

दरम्यान, कामगार क्षेत्रातील भेदभाव संपवण्यासाठी उचललेल्या पावलांचा संदर्भ देत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, सरकार (Government) असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, बुधवारी जिनिव्हा येथे 'प्रोमोटिंग सोशल जस्टिस' या विषयावरील परिषदेत कामगार मंत्र्यांनी ही माहिती दिली.

PM Narendra Modi
PM Kisan Samman Nidhi Scheme: प्रतीक्षा लवकरच संपणार! जूनच्या 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 14 वा हप्ता

मोदी सरकारने उचललेली पावले

निवेदनानुसार, मंत्र्यांनी श्रमिक बाजारपेठेतील भेदभाव दूर करण्यासाठी सरकारच्या सामाजिक न्याय-प्रोत्साहन कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. श्रमिक बाजारपेठेतील भेदभाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारने उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली. यादव म्हणाले की, भारत असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही सामाजिक सुरक्षेचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे.

PM Narendra Modi
PM Kisan FPO Yojana: PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, खात्यात येणार एवढे लाख रुपये; असा करा अर्ज

ई-लेबर पोर्टल

ते पुढे म्हणाले की, सरकारचे ई-लेबर पोर्टल हे सर्वांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. सरकार यासाठी कौशल्य विकास, कौशल्य अपग्रेड आणि कर्मचार्‍यांचे रीस्किलिंग देखील करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com