Modi Government: पासपोर्टशी संबंधी मोठी घोषणा, 'या' नवीन आणि खास सुविधा देणार सरकार!

देशात लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा PSP 2.0 सुरु होणार आहे. या अंतर्गत नवीन आणि अपग्रेडेड पासपोर्ट जारी केले जातील.
Passport
Passport Dainik Gomantak
Published on
Updated on

Modi Government: देशात लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा PSP 2.0 सुरु होणार आहे. या अंतर्गत नवीन आणि अपग्रेडेड पासपोर्ट जारी केले जातील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही घोषणा केली आहे.

एस जयशंकर यांनी भारत आणि परदेशातील पासपोर्ट जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळेवर, विश्वासार्ह, सोयीस्कर, पारदर्शक रीतीने पासपोर्ट आणि संबंधित सेवा प्रदान करण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क करावे.

पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त केंद्रीय मंत्री म्हणाले की, "आम्ही लवकरच पासपोर्ट (Passport) सेवा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरु करणार आहोत, ज्यामध्ये नवीन आणि अपग्रेड केलेले ई-पासपोर्ट प्रदान केले जातील."

Passport
Terror Funding Case: NIA कडून 13 पाकिस्तानी नागरिकांवर आरोपपत्र; आखत होते दहशत पसरवण्याचा कट

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या व्हिजन अंतर्गत डिजिटल इको-सिस्टीमच्या दिशेने एक नवीन पाऊल म्हणून याकडे पाहिले पाहिजे. यादरम्यान ते म्हणाले की, मी भारतातील (India) आणि परदेशातील सर्व पासपोर्ट जारी करणार्‍या अधिकाऱ्यांना पासपोर्ट आणि संबंधित सेवा सुलभ करण्यासाठी सरकारशी संपर्क साधावा.

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचा मेसेज ट्विटरवर शेअर करताना, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटिमध्ये म्हटले आहे की, "पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे सुनिश्चित करते की आम्ही आमच्या पासपोर्ट आणि संबंधित सेवा प्रदान करणे सुरु ठेवू.''

Passport
Terror Funding Case: NIA ने 'या' ट्रस्टच्या आवळल्या मुसक्या, दाखल केले आरोपपत्र; धर्मादाय संस्थेच्या नावाने...

कोविडनंतर परदेश प्रवास वाढला

एस जयशंकर म्हणाले की, ''कोरोना महामारीनंतर पासपोर्ट-संबंधित सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन मंत्रालयाने वेगाने कार्यवाही सुरु केली आहे. या अंतर्गत, विशेष मोहिमेअंतर्गत दैनंदिन अपॉइंटमेंट्स आणि वीकेंडला पासपोर्ट सेवा पुरवली जात आहे.''

2022 मध्ये 13.32 दशलक्ष पासपोर्ट आणि संबंधित सेवा प्रदान करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 2021 च्या तुलनेत 63% वाढ झाली आहे.

पासपोर्ट सेवा केंद्रांना भेट द्या

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाच्या उद्दिष्टाने पासपोर्ट सेवा कार्यक्रम झपाट्याने पुढे सरकल्याचे त्यांनी सांगितले. अनेक राज्यांतील पासपोर्ट सेवा केंद्रांना भेटी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या पासपोर्ट सेवा केंद्रांना इतर मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही भेट दिली आहे. या भेटींमुळे ऑपरेशनल गव्हर्नन्स आणि धोरणाची योग्य अंमलबजावणी करण्यात मदत झाली आहे. भविष्यातही अशी पावले उचलली जातील.

Passport
Terror Funding: दाऊद इब्राहिम अन् त्याच्या साथीदारांवर एनआयएची मोठी कारवाई

पासपोर्ट सेवा कार्यक्रमांतर्गत या सुविधा उपलब्ध आहेत

पासपोर्ट सेवा कार्यक्रमांतर्गत डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यात मदत झाली आहे. या अंतर्गत mPassport सेवा मोबाईल अॅप, mPassport पोलीस अॅप, पासपोर्ट सेवा कार्यक्रम डिजीलॉकरसह एकत्रीकरण आणि कुठूनही अर्ज करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

2014 पर्यंत देशभरात फक्त 77 पासपोर्ट सेवा केंद्रे होती, ती आता जवळपास 7 पटीने वाढून 523 झाली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या या सेवेत पोस्ट विभाग आणि पोलिसांनीही खूप मदत केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com