MG Windser Pro Launch: टाटा नेक्सॉन अन् ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणारी 'एमजी विंडसर प्रो' लॉन्च; जाणून घ्या अफलातून फीचर्स, किंमत

MG Windser Pro EV Launched: देशाच्या इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये मोठं घमासान पाहायला मिळणार आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला टक्कर देणारी एमजी विंडसर प्रो ईव्ही मंगळवारी (6 मे) लॉन्च करण्यात आली.
MG Windser Pro EV Launched
MG Windser Pro LaunchDainik Gomantak
Published on
Updated on

देशाच्या इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये मोठं घमासान पाहायला मिळणार आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला टक्कर देणारी एमजी विंडसर प्रो ईव्ही मंगळवारी (6 मे) लॉन्च करण्यात आली. एका चार्जमध्ये ही कार 449 किमी पर्यंतचे अंतर कापते. या कारची सुरुवातीची किंमत 12.50 लाख रुपये एवढी असून तिची बुकिंग 8 मे पासून सुरु होत आहे.

एमजी विंडसर प्रो फिक्स्ड बॅटरी आणि रेंटल बॅटरी पर्यायांसह येते. जर ग्राहकांना ती फिक्स्ड बॅटरीसह खरेदी करायची असेल तर त्यांना ही कार 17.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. तर रेंटलसाठी तुम्हाला प्रति किमी 4.5 रुपये दराने पैसे द्यावे लागतील. ही कारची सुरुवातीची किंमत आहे, ज्याचा फायदा 8,000 ग्राहक घेऊ शकतात. या कारची किंमत ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ईव्ही मॅक्सच्या जवळपास आहे.

MG Windser Pro EV Launched
Tata Altroz: टाटा करणार मोठा धमाका! 2 CNG सिलेंडरसह लॉन्च करणार शानदार कार; स्विफ्ट आणि ब्रेझाला देणार टक्कर

एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये तुम्हाला 52.9 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक मिळेल. ती एका चार्जमध्ये 449 किमीची रेंज देईल. सध्या, मार्केटमध्ये उपलब्ध या कारचे नॉर्मल व्हर्जन एका चार्जमध्ये 332 किमीची रेंज देते.

MG Windser Pro EV Launched
Tata Punch: नेक्सॉनपेक्षा 2 लाखांनी स्वस्त असणारी 'टाटा पंच' बनली नंबर 1, ब्रेझालाही सोडले मागे; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरचं काही

सेफ्टी आणि आराम

दरम्यान, या कारमध्ये कंपनीने लेव्हल-2 एडीएएस देखील दिले आहे. यामुळे कारची ऑटोमेशन क्षमता आणि सेफ्टी वाढते. याशिवाय, ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स त्यात उपलब्ध असतील. या कारने तुम्ही इतर इलेक्ट्रिक कार आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे देखील चालवू शकता. ही कार तीन नवीन कलरमध्ये येते. हे कलर ऑरोरा सिल्व्हर, ग्लेझ रेड आणि सेलेडॉन ब्लू आहेत. एमजी विंडसर ही देशातील प्रसिद्ध कारपैकी एक आहे. तिचे नॉर्मल व्हर्जन सुमारे 8 महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. कंपनीने 10 लाखांपेक्षा कमी किमतीत या कारसह 'बॅटरी अ‍ॅज अ सर्व्हिस' (रेंटल बॅटरी) हा पर्याय सुरु केला, ज्यामुळे ही कार (Car) अनेक महिने देशातील नंबर-1 इलेक्ट्रिक कार राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com