मारुती सुझुकीने लॉन्च केली नवीन योजना

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली.
Maruti Suzuki
Maruti Suzuki Dainik Gomantak
Published on
Updated on

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना आणली. MSI ने इंजिनमधील हायड्रोस्टॅटिक लॉक लक्षात घेऊन आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यास ग्राहकांना विशेष कव्हर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात मोठ्या कार कंपनीने ग्राहकांसोबत विक्रीनंतरची सेवा अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्राहक सुविधा पॅकेज (CCP) देखील सादर केले आहे. या पॅकेजअंतर्गत वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने किंवा चुकीच्या किंवा भेसळयुक्त इंधनामुळे होणारे नुकसान भरून काढले जाणार आहे. (Maruti Suzuki launches new scheme)

Maruti Suzuki
Crude oil price : कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले

मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी यांनी पीटीआयला सांगितले, रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने आणि भेसळयुक्त इंधनामुळे इंजिन बंद पडण्याच्या किंवा बिघाड होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ दिसून आली आहे.

इंजिनला 500 रुपयांत संरक्षण मिळणार,

बॅनर्जी म्हणाले की, अशा परिस्थितीत ग्राहकांनी आता घाबरण्याची गरज नाहीये. अर्थात, ग्राहकांनी आपली वाहने साचलेल्या पाण्याच्या रस्त्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परंतु इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास आम्ही त्याची पुर्णपणे काळजी घेऊ. या पॅकेजचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नाममात्र रक्कम भरावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वॅगन आर आणि अल्टोच्या ग्राहकांसाठी ही रक्कम सुमारे 500 रुपये एवढी असणार आहे.

Maruti Suzuki
टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका

हायड्रोस्टॅटिक लॉक किंवा तेलाच्या भेसळीमुळे इंजिनमध्ये बिघाड झाल्यास, तुम्हाला तुमची कार कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनवरती न्यावी लागेल आणि कंपनी कोणत्याही प्रश्नाशिवाय तिचे निराकरण करेल असंही कंपनीने सांगितले आहे.

मारुतीच्या अधिकृत कार्यशाळेत सुविधा उपलब्ध असणार,

बॅनर्जी म्हणाले की, मारुती सुझुकीने अधिकृत केलेल्या देशभरातील कोणत्याही अधिकृत कार्यशाळेला भेट देऊन या पॅकेजचा लाभ घेता येईल. मारुती सुझुकीचे देशभरातील 2100 हून अधिक शहरांमध्ये 4200 हून अधिक सेवा टच पॉइंट्स आहेत. तसेच अनेक ग्राहकांनी इंजिन खराब झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याशिवाय काही वेळा तेलात भेसळ झाल्याने इंजिन खराब झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कंपनीने नवे पॅकेज देखील सुरू केले आहे.

Maruti Suzuki
इन्शुरन्स घेताय मग 'ही' बातमी तुमच्या कामाची, अन्यथा क्लेममध्ये येणार अडचण

फेब्रुवारीमध्ये मारुतीची विक्री कमी झाली

मारुतीची देशांतर्गत विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये 1,52,983 युनिट्सच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 8.46 टक्क्यांनी घसरून 1,40,035 युनिट्सवरती आल आहे. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेचा प्रामुख्याने देशांतर्गत बाजारात विक्री होणाऱ्या वाहनांच्या उत्पादनावरती सौम्य परिणाम झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com