इन्शुरन्स घेताय मग 'ही' बातमी तुमच्या कामाची, अन्यथा क्लेममध्ये येणार अडचण

विम्याचे 'हे' आहेत फायदे
importance of term insurance medical test jiwan bima life insurance
importance of term insurance medical test jiwan bima life insurance Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना (corona) महामारीमुळे विम्याचे महत्त्व चांगलेच समजले आहे. टर्म इन्शुरन्सची मागणी आज बाजारात खूप आहे. लोक टर्म लाइफ इन्शुरन्सला अधिक महत्त्व देत आहेत जेणेकरुन कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये.

आपत्कालीन किंवा दुर्दैवी परिस्थिती जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे उर्वरित कुटुंब आर्थिकदृष्ट्या मागास होऊ शकते. टर्म इन्शुरन्स घेऊन, तुम्ही खात्री करू शकता की तुमच्यानंतरही तुमच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळत राहील.

आयुष्य निश्चित कालावधीसाठी सुरक्षित

मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या मते, मुदत विमा योजना हा जीवन विमा कराराचा एक प्रकार आहे. ज्यानुसार पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाकडून नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. या विमा पॉलिसीला टर्म इन्शुरन्स असे म्हणतात. कारण ती पॉलिसीधारकाचे आयुष्य एका विशिष्ट कालावधीसाठी कव्हर करते. पॉलिसीची मुदत संपल्यावर पॉलिसीधारक सुरक्षित राहिल्यास, टर्म प्लॅन (plan) त्याला कोणतीही मॅच्युरिटी रक्कम देत नाही. हेच कारण आहे की मुदतीचा विमा इतका स्वस्त आहे.

importance of term insurance medical test jiwan bima life insurance
फक्त 1500 रुपयांमध्ये एसीचा आनंद घ्या, घरबसल्या करा बुक

टीव्हीवर टर्म लाइफ इन्शुरन्सच्या (insurance) भरपूर जाहिराती आहेत. बाजारातही अनेक प्रकारची विमा उत्पादने आहेत. टर्म लाइफ इन्शुरन्स देताना, विमा कंपन्या पॉलिसीधारकाच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल मागतात. पण काही कंपन्या अशा आहेत ज्या वैद्यकीय चाचण्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत.

ज्या विमा कंपन्या अटी किंवा शर्तींच्या बाबतीत कठोर नसतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे विमा तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण योग्य वैद्यकीय चाचणी अहवाला नसेल तर इन्शुरन्स रद्द केला जाऊ शकतो. कारण, ज्या पॉलिसीधारकाने त्याच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती दिली नाही, अशा स्थितीत, नॉमिनीला इन्शुरन्स करण्यात खूप अडचणी येऊ शकतात, असे सांगून अनेक वेळा इन्शुरन्स नाकारला जातो.

importance of term insurance medical test jiwan bima life insurance
अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह, जिओची मोठी ऑफर

योग्य वैद्यकीय चाचणीनंतरच मुदत विमा

तुम्ही जेव्हाही मुदतीचा विमा घ्याल तेव्हा तुमची वैद्यकीय चाचणी योग्य प्रकारे करून घ्या. वैद्यकीय चाचणीनंतर अहवालाची जबाबदारी विमा कंपनी आणि डॉक्टरांवर असते. अशा परिस्थितीत, नॉमिनीला इन्शुरन्स निकाली काढताना फारसा त्रास होत नाही.

मुदत विम्याचे फायदे

मुदत विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करतो.

टर्म प्लॅन्सना आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

- नामांकित व्यक्तीला विम्याची रक्कम एकरकमी किंवा मासिक अदा करण्याचा पर्याय.

पॉलिसी कव्हर कालावधी किमान 10 वर्षे ते कमाल 50 वर्षे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com