Multibagger Maan Aluminium : तुमच्याही एका लाखाचे झाले असते 40 लाख! 8 रुपयांच्या शेअरची 322 रुपयांवर उडी

Indian Share Market : मान अ‍ॅल्युमिनियम शेअर्सने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना बोनस देण्याची घोषणा केली आहे.
Share Market
Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Maan Aluminium to issue bonus

शेअर मार्केट हा अचूक हिशोबाचा खेळ आहे. तुमचा अंदाज योग्य असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. पण जर सट्टा चुकीचा ठरला तर तुम्हाला मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते.

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला मजबूत नफा मिळवायचा असेल तर योग्य शेअर्स निवडा आणि ते दीर्घकाळ होल्ड करून ठेवा.

असा एक स्टॉक आहे, ज्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे आणि रु. 1 लाख गुंतवणुकीचे रूपांतर रु. 40 लाखात केले आहे. मान अ‍ॅल्युमिनियम असे या शेअरचे नाव आहे. 2016 मध्ये या स्टॉकची किंमत 7.83 रुपये होती. आता अवघ्या 7 वर्षांत याची किंमत 322 रुपये.

बोनसची घोषणा

आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने मजबूत परतावा देणाऱ्या मान अ‍ॅल्युमिनियम बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली आहे.

याशिवाय, कंपनी 1:2 च्या प्रमाणात स्टॉक विभाजित करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बोर्डाने पात्र स्टॉकधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस देण्यास मान्यता दिली आहे.

कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याचा एक शेअर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या दोन शेअर्समध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठीची रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकते.

Share Market
Indian sailors detained in Nigeria : नऊ महिने नायजेरियाच्या तुरुंगांत काढले, मायदेशी परतताच खलाशी म्हणाला, “आता माझ्या...”

 4,000 टक्क्यांहून अधिक परतावा

मान अ‍ॅल्युमिनियमने गेल्या सात वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

सुमारे सात वर्षांपूर्वी, 24 जून 2016 रोजी बीएसईवर मान अ‍ॅल्युमिनियमचे शेअर्स 7.83 रुपयांच्या पातळीवर होते.

आज एका शेअरची किंमत 322.90 रुपयांवर पोहोचली आहे. अशाप्रकारे गेल्या सात वर्षांत मान अ‍ॅल्युमिनियमच्या शेअरच्या किमतीत ४०२३.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Share Market
Watch Video: शत्रूंचा थरकाप उडवणारे दृश्य! अरबी समुद्रात एकाच वेळी 35 लढाऊ विमाने आणि 2 विमानवाहू नौंका काय करत होत्या?

एक लाखाची गुंतवणूक झाली 40 लाखांहून अधिक

जर एखाद्या गुंतवणूकदाराने सात वर्षांपूर्वी मान अ‍ॅल्युमिनियमच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते टिकवून ठेवले असते, तर आज 1 लाख रुपये 41 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

अलिकडच्या काळात स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, गेल्या पाच दिवसांत तो 36.58 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 73.66 टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या सहा महिन्यांत मान अ‍ॅल्युमिनियमचे शेअर्स ८१.४६ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका वर्षात या शेअरने 181.97 टक्क्यांनी झेप घेतली आहे.

शुक्रवारी मान अ‍ॅल्युमिनियमचे शेअर्स बीएसईवर 1.60 टक्क्यांनी वाढून 322.90 रुपयांवर बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com