Rules Changed 1 June: सर्वसामान्यांना दिलासा! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; 1 जूनपासून बदलले 'हे' नियम

LPG Cylinder Rate: तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली. गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या. 1 जून रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 24 रुपयांची कपात केली.
Rules Changed 1 June
Rules Changed 1 JuneDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन महिना सुरु झाला आहे. जूनच्या पहिल्याच दिवशी महागाईपासून लोकांना दिलासा मिळाला. तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली. गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या. 1 जून रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 24 रुपयांची कपात केली. या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत 1723.50 रुपये होईल. केवळ गॅस सिलिंडरच नाहीतर 1 जूनपासून बरेच काही बदलले आहे. अनेक नियम बदलले आहेत. चला तर मग याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

1 जूनपासून काय बदलले

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (EPFO) नवीन उपक्रम 1 जून 2025 पासून सुरु झाला आहे. EPFO ​​ने त्यांचे नवीन प्लॅटफॉर्म EPFO ​​3.0 लाँच करण्याची योजना आखली आहे, जे जून 2025 पासून सुरु होऊ शकते. नवीन प्लॅटफॉर्मद्वारे, PF योगदानकर्ते UPI आणि ATM द्वारे त्वरित PF निधी काढू शकतील.

Rules Changed 1 June
1 December Rule Changes: 1 डिसेंबरपासून क्रेडिटकार्ड आणि सिमकार्डसह बदलणार 'हे' 5 नियम, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका!

आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख

जर तुम्हाला तुमचे आधार अपडेट करायचा असेल, तर त्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डधारकांना 14 जून 2025 पर्यंत मोफत आधार अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. त्यानंतर 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

UPI पेमेंट नियम

UPI पेमेंटच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. UPI 123Pay सेवेअंतर्गत, फीचर फोन वापरकर्त्यांना ऑनलाइन पेमेंटची (Online Payment) सुविधा मिळेल. त्याचवेळी, 1 जून 2025 पासून, या सेवेची व्यवहार मर्यादा 5,000 रुपयांवरुन 10,000 रुपये केली जाईल.

Rules Changed 1 June
Rules Change From July 1, 2023: 1 जुलैपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

क्रेडिट कार्ड

1 जूनपासून, कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी, ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाल्यास, बँक 2 टक्के बाउन्स शुल्क आकारेल, जे 450 रुपयांपर्यंत आणि जास्तीत जास्त 5000 रुपयांपर्यंत असू शकते.

म्युच्युअल फंड नियम

SEBI ने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी एक नवीन कट-ऑफ वेळ निश्चित केली, जी 1 जूनपासून ऑफलाइन व्यवहार वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आणि ऑनलाइन वेळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com