1 December Rule Changes: 1 डिसेंबरपासून क्रेडिटकार्ड आणि सिमकार्डसह बदलणार 'हे' 5 नियम, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका!

1 December Rule Changes: देशात दर महिन्याला काही नियमांमध्ये बदल होत असतात. यावर्षी 2023 मध्येही बरेच बदल झाले.
1 December Rule Changes
1 December Rule Changes Dainik Gomantak
Published on
Updated on

1 December Rule Changes: देशात दर महिन्याला काही नियमांमध्ये बदल होत असतात. यावर्षी 2023 मध्येही बरेच बदल झाले. आता 2023 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरु होणार आहे. वर्ष संपण्यापूर्वी बँकिंग, दूरसंचार, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात बदल दिसून येतील. सिमकार्ड, HDFC क्रेडिट कार्ड, गॅस सिलिंडरशी संबंधित अनेक नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू होण्यास तयार आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबरपासून लागू होणारे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या नवीन नियमांचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया?

SIM Card New Rules

केंद्र सरकार 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डबाबत नवीन नियम लागू करणार आहे. हा नवा नियम सिमकार्डच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार आता केवायसी प्रक्रियेशिवाय सिमकार्ड खरेदी करता येणार नाही. याशिवाय, एका ओळखपत्रावर मर्यादित सिमकार्ड विकण्याचा नियमही लागू केला जाणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या दोषीला 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या नवीन नियमांनुसार, सिमकार्ड विक्रेत्याला नोंदणी करावी लागेल आणि सिस्टम अंतर्गत केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.

1 December Rule Changes
Rules Change From July 1, 2023: 1 जुलैपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

HDFC Bank Regalia Credit Card

नवीन नियमांनुसार, HDFC बँक त्यांच्या Regalia क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहे. 1 डिसेंबरपासून वापरकर्त्यांना लाउंजमध्ये एक्सेस मिळावा यासाठी नियम बदलले जात आहेत. लाउंज एक्सेससाठी वापरकर्त्यांना वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येईल. जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत वापरकर्त्यांना 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल, त्यानंतरच त्यांना लाउंजमध्ये एक्सेस मिळू शकेल. वापरकर्त्यांना एका तिमाहीत फक्त दोनदा लाउंज एक्सेसचा लाभ घेता येईल. यासाठी 2 रुपये व्यवहार शुल्क देखील आहे. तर, मास्टरकार्ड वापरकर्त्यांकडून 25 रुपये शुल्क आकारले जाईल, जे नंतर परत केले जाईल.

1 December Rule Changes
Rules Change From June 1, 2023: 1 जूनपासून होणार 'हे' मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; जाणून घ्या

LPG Cylinder Price

दरम्यान, 1 डिसेंबर 2023 पासून LPG सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतात. नोव्हेंबरमध्ये कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. लग्नसराईमुळे त्याची किंमतही वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत सिलिंडरच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.

Loan New Rules

दुसरीकडे, 1 डिसेंबर 2023 पासून RBI द्वारे लोन संबंधित नियम लागू केले जातील. या अंतर्गत, कर्जाची परतफेड केल्यानंतर 1 महिन्याच्या आत कर्ज देण्यासाठी बँकेने सादर केलेल्या मालमत्तेची कागदपत्रे परत करणे आवश्यक असेल. बँकेने असे न केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com