स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

KTM RC 160 Launch: तरुणाईच्या मनावर राज्य करणाऱ्या KTM इंडियाने अखेर आपली नवीन स्पोर्ट्स बाईक KTM RC 160 भारतात लाँच केली आहे.
KTM RC 160
KTM RC 160Dainik Gomantak
Published on
Updated on

तरुणाईच्या मनावर राज्य करणाऱ्या KTM इंडियाने अखेर आपली नवीन स्पोर्ट्स बाईक KTM RC 160 भारतात लाँच केली आहे. १.८५ लाख रुपये (एक्स-शोरूम) या किमतीत लाँच झालेली ही बाईक सुपरस्पोर्ट श्रेणीत खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे. या नवीन मॉडेलच्या आगमनाने कंपनीने आपली जुनी RC 125 बंद केली असून, आता ही बाईक RC लाइनअपमधील सर्वात किफायतशीर पर्याय ठरली आहे.

दमदार लूक

KTM RC 160 चे डिझाइन पूर्णपणे RC 200 कडून प्रेरित आहे. यामध्ये दिलेली LED हेडलाइट, डे-टाइम रनिंग लाईट्स (DRLs) आणि विंडशील्ड यांमुळे ही बाईक दुरून पाहिल्यावर एखाद्या मोठ्या रेसिंग बाईकसारखी भासते. पॉलोगोनल रिअर-व्ह्यू मिरर, स्प्लिट सीट आणि मस्क्युलर फ्युएल टॅंक यांमुळे या बाईकचा लूक अधिक 'शार्प' झाला आहे. फेअरिंगवर दिलेला 'RC 160' चा बॅज आणि KTM चे सिग्नेचर 'रेडी टू रेस' ग्राफिक्स याला एक वेगळी ओळख देतात.

KTM RC 160
Goa Opinion: 'बर्च क्लब'प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अन्यथा गोव्यातील पर्यटन मान टाकेल आणि राज्य भयाण आर्थिक संकटात सापडेल..

इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मन्स

या बाईकमध्ये १६४ सीसीचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ९,५०० आरपीएमवर १९ हॉर्सपावर आणि ७,५०० आरपीएमवर १५.५ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, हे इंजिन आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक पॉवर देते. ६-स्पीड गिअरबॉक्सच्या मदतीने ही बाईक ११८ किमी प्रतितास या वेगाने धावू शकते. उत्कृष्ट 'पॉवर-टू-वेट' रेशो असल्यामुळे ही बाईक चालवताना रायडरला वेगवान अनुभवाची खात्री मिळते.

आधुनिक फीचर्स

सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता, KTM ने यामध्ये ड्युअल-चॅनल ABS दिले आहे. समोर ३२० मिमी आणि मागे २३० मिमीची डिस्क ब्रेक देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, ३७ मिमीचे इनवर्टेड फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशनमुळे खडबडीत रस्त्यांवरही प्रवास सुखकर होतो. आधुनिक फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये नेव्हिगेशन आणि कनेक्टिव्हिटीसह एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, असिस्ट आणि स्लिपर क्लच आणि पूर्णतः एलईडी लाइटिंग सेटअप देण्यात आला आहे.

KTM RC 160
Goa Nightclub Fire: दुःख..अश्रू आणि लढा! हडफडेप्रकरणी लुथरा बंधूंच्‍या अर्जावर सुनावणी; मृतांच्या तसबिरी घेऊन जोशी कुटुंब न्यायालयात

Yamaha R15 सोबत होणार थेट मुकाबला

बाजारात या बाईकची थेट स्पर्धा Yamaha R15 सोबत आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेमुळे यामाहाने आपल्या R15 च्या किमतीत ५,००० रुपयांची कपात केली असून ती आता १.६६ लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. आता KTM चे प्रीमियम फीचर्स आणि यामाहाचा विश्वासार्हता यामध्ये कोण बाजी मारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com