Goa Nightclub Fire: दुःख..अश्रू आणि लढा! हडफडेप्रकरणी लुथरा बंधूंच्‍या अर्जावर सुनावणी; मृतांच्या तसबिरी घेऊन जोशी कुटुंब न्यायालयात

Delhi Joshi family protest: पीडितांच्या वतीने अ‍ॅड. विष्णू जोशी यांनी युक्तिवाद केला की, ज्या दिवशी लुथरा बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे उत्पादन शुल्काचा परवाना मिळवला.
Arpora Birch Club fire case, Luthra brothers anticipatory bail, Delhi Joshi family protest
Arpora Birch Club fire case, Luthra brothers anticipatory bail, Delhi Joshi family protestDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबसाठी अबकारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळवताना कांदोळी आरोग्य केंद्राचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र वापरण्यात आल्याच्या प्रकरणात संशयित लुथरा बंधूंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाविरोधात दिल्लीतील पीडित जोशी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवरील निवाडा म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने येत्या १३ जानेवारी दुपारपर्यंत राखून ठेवला आहे.

दरम्‍यान, बुधवारी झालेल्या सुनावणीला पीडित जोशी कुटुंबातील चौघे नातेवाईक न्यायालयात हजर होते. ते मृतकांच्या तसबिरी हातात धरून न्यायालयात उभे राहिले होते. संपूर्ण सुनावणीदरम्यान त्यांनी अशा प्रकारे आपले भावनिक म्हणणे अप्रत्यक्षपणे मांडले.

पीडितांच्या वतीने अ‍ॅड. विष्णू जोशी यांनी युक्तिवाद केला की, ज्या दिवशी लुथरा बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोट्या दस्तऐवजांच्या आधारे उत्पादन शुल्काचा परवाना मिळवला, त्या क्षणापासूनच या दुर्घटनेची प्रक्रिया सुरू झाली असेच म्हणावे लागेल. संशयितांची बेफिकिरी व हलगर्जीपणामुळे २५ निष्पाप लोकांना आपला प्राण गमवावा लागला.

Arpora Birch Club fire case, Luthra brothers anticipatory bail, Delhi Joshi family protest
Goa Nightclub Fire: 'लुथरा बंधूंना फाशी द्या', बर्च अग्निकांडप्रश्‍नी दिल्लीत निदर्शने; पीडितांच्या नातेवाईकांची जंतरमंतर येथे न्यायाची मागणी

त्यात जोशी कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. असे असतानाही आम्हाला या प्रकरणात हस्तक्षेप करता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात येतो, हे धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. पीडितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून हस्तक्षेप याचिका मान्य करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Arpora Birch Club fire case, Luthra brothers anticipatory bail, Delhi Joshi family protest
Nightclubs In Goa: गोवेकरांना मारक ठरू शकणारे 'नाइटक्लबांचे जाळे' तोडून टाकावेच; गोव्याचे अनिष्ट गोष्टीपासून रक्षण करावे..

याउलट, लुथरा बंधूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, बनावट दस्तऐवजांच्या या प्रकरणात जोशी कुटुंबीयांचा थेट संबंध नसून त्यांना हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. सादर करण्यात आलेला अर्ज सर्वसाधारण स्वरूपाचा असून त्यात नेमकी कारणे नमूद करण्यात आलेली नाहीत. तसेच, या कथित गुन्ह्यामुळे जोशी कुटुंबावर थेट कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे त्यांना ‘पीडित’ म्हणता येणार नाही. दरम्‍यान, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने यावरील निर्णय १३ जानेवारी दुपारपर्यंत राखून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com