Kolkata Under Water Metro: देशात पहिल्यांदाच पाण्याखाली धावली मेट्रो ट्रेन, कोलकाताने दुसऱ्यांदा रचला इतिहास; थरारक VIDEO

Kolkata Metro: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी मेट्रो ट्रेन नदीच्या पात्राखाली सुमारे 13 मीटर धावली.
Kolkata Metro
Kolkata MetroDainik Gomantak
Published on
Updated on

Kolkata Under Water Metro: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे बुधवारी मेट्रो ट्रेन नदीच्या पात्राखाली सुमारे 13 मीटर धावली. पाण्याखालील मेट्रो प्रकल्पांतर्गत त्याची चाचणी घेण्यात आली. त्यासाठी कोलकात्यात हुगळी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.

सात महिन्यांच्या चाचणीनंतर ती नियमितपणे चालवली जाईल. मेट्रोच्या दृष्टीने कोलकात्याच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. देशात पहिली मेट्रो 1984 मध्ये सुरु झाली. त्यानंतर 2002 मध्ये दिल्लीत मेट्रो कार्यान्वित झाली.

येथे व्हिडिओ पाहा…

Kolkata Metro
Indian Railways: अश्विनी वैष्णव यांचा धक्कादायक निर्णय, बंद झाली 'ही' जुनी व्यवस्था!

ट्रेन साडेअकरा वाजता निघाली

बुधवारी, कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (KMRC) सकाळी ठीक 11.30 वाजता एक मेट्रो रेक क्रमांक MR-612 महाकरणला रवाना झाली. तर, सकाळी 11.40 वाजता ही मेट्रो रेक महाकरणहून हावडा मैदानाकडे निघाला आणि दुपारी ठीक 12 वाजता हावडा मैदानावर पोहोचला.

हुगळी नदीखाली बोगदा बांधला

कोलकाता (Kolkata) येथील पाण्याखालील प्रकल्पाला पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत भारताला (India) लवकरच पहिली अंडरवॉटर मेट्रो ट्रेन मिळणार आहे. ज्याची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे. त्यासाठी कोलकात्यात हुगळी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.

सॉल्ट लेक, हावडा मैदान आणि सेक्टर V ला जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरमध्ये हुगळीच्या खाली दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. ट्रायल रनचा भाग म्हणून दोन ते सहा डबे असलेली मेट्रो ट्रेन एस्प्लेनेड आणि हावडा मैदानादरम्यान 4.8 किमी अंतर कापेल.

Kolkata Metro
Indian Railways: उद्या 'या' रुटवर धावणार वंदे भारत, PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

पूर्व-पश्चिम कॉरिडॉर 15 किमी लांबीचा

कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशननुसार, भूमिगत पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. कोलकाता मेट्रोचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर 15 किलोमीटर लांब आहे.

सॉल्ट लेक सेक्टर 5 ते सॉल्ट लेक स्टेडियम या मेट्रो मार्गावर करुणामयी, सेंट्रल पार्क, सिटी सेंटर आणि बंगाल केमिकल येथे मेट्रो स्टेशन असतील. हा प्रकल्प कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एस्प्लेनेड स्टेशनला हावडा आणि सियालदह या रेल्वे स्थानकांसोबत जोडेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com