Indian Railways: उद्या 'या' रुटवर धावणार वंदे भारत, PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

Delhi-Jaipur-Ajmer-Vande Bharat: अलीकडेच सिकंदराबाद ते तिरुपती आणि चेन्नई ते कोईम्बतूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Delhi-Jaipur-Ajmer-Vande Bharat: अलीकडेच सिकंदराबाद ते तिरुपती आणि चेन्नई ते कोईम्बतूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला.

यासोबतच देशात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या 13 झाली आहे. पंतप्रधान मोदी आणखी एका नव्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

ही ट्रेन देशातील इतर वंदे भारत पेक्षा वेगळी असेल. ट्रेनची खासियत म्हणजे तिची प्रवासाची पद्धत, ज्यामुळे ती जगात वेगळी ठरेल.

OHE वर धावणारी सेमी हाय स्पीड ट्रेन

पीएम मोदी 12 एप्रिल रोजी राजस्थानमधील (Rajasthan) पहिल्या वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान चालवली जाईल. या मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा एक तास कमी लागणार आहे.

ही ट्रेन जगातील सर्वात उंच OHE वर धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन असेल, ही त्याची खासियत असेल. सामान्य OHE पेक्षा जास्त वेगाने धावणारी ही पहिली वंदे भारत ट्रेन असेल.

Vande Bharat Express
Indian Railways: अश्विनी वैष्णव यांचा धक्कादायक निर्णय, बंद झाली 'ही' जुनी व्यवस्था!

अजमेरला 5 तास 15 मिनिटांत पोहोचणार

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी वंदे भारत ट्रेन जयपूर ते दिल्ली कॅन्टपर्यंत धावणार आहे. दुसऱ्या दिवसापासून अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान ट्रेन सामान्यपणे धावेल. ही ट्रेन दिल्ली (Delhi) ते अजमेर हा प्रवास 5 तास 15 मिनिटांत पूर्ण करेल. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनने पुष्कर, अजमेर शरीफ दर्ग्यासाठी प्रवास करता येणार आहे.

Vande Bharat Express
Indian Railways: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमंत्र्यांनी दिलं मोठं गिफ्ट, ट्रेनमध्ये 'या' सुविधा...

ट्रेनचा सरासरी वेग 72.74 किमी प्रतितास

या ट्रेनचा सरासरी वेग 72.74 किमी प्रतितास आहे. प्रति तास असेल. अजमेर आणि दिल्ली दरम्यान ट्रेनचे तीन थांबे जयपूर, अलवर आणि गुडगाव असतील.

अजमेरहून सकाळी 6.20 वाजता सुरु होणारी ही ट्रेन जयपूरला सकाळी 7.55 वाजता पोहोचेल. येथून सकाळी 8 वाजता सुटेल आणि 9.40 वाजता अलवरला पोहोचेल आणि नंतर 11.21 वाजता गुडगावला पोहोचेल. यानंतर ही ट्रेन सकाळी 11.35 वाजता दिल्ली कॅन्टला पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
Goa Fodder Production Plan
India Nuclear Weapons Report 2026
Drug Free Goa Campaign
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com