Jet Airways
Jet AirwaysDainik Gomantak

जेट एअरवेजसाठी आनंदाची बातमी, विमानसेवा पुन्हा सुरु होणार; JKC ने केली 100 कोटींची गुंतवणूक

Jalan Kalrock Consortium: जालान कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) ने बंद पडलेल्या विमान कंपनी जेट एअरवेजमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
Published on

Jalan Kalrock Consortium: जालान कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) ने बंद पडलेल्या विमान कंपनी जेट एअरवेजमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

JKC ने एअरलाइनचे कामकाज पुन्हा सुरु करण्यासाठी न्यायालयाने मंजूर केलेल्या ठराव योजनेतर्गंत अतिरिक्त गुंतवणूकीची (Investment) घोषणा केली.

JKC ने जारी केलेल्या निवेदनानुसार, यासह कन्सोर्टियमने एअरलाइनच्या पुनरुज्जीवनासाठी 350 कोटी रुपयांची एकूण आर्थिक वचनबद्धता 'पूर्ण' केली आहे.

येत्या काही दिवसांत कामकाजाची तारीख जाहीर होऊ शकते

पुढील वर्षी विमानसेवा सुरु होईल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. त्याची सेवा सुरु होण्याची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. जेट एअरवेजचे ऑपरेशन 17 एप्रिल 2019 पासून बंद आहे.

जालान कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) कर्ज निराकरण प्रक्रियेत विजयी बोलीदार म्हणून उदयास आले होते. 28 ऑगस्ट रोजी, NCLAT ने जालान-कॅलरॉक कन्सोर्टियमला ​​350 कोटी रुपयांची थकबाकी फेडण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.

Jet Airways
Jet Airways: जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, कंपनीचा मोठा निर्णय!

2024 मध्ये ऑपरेशन सुरु होण्याची अपेक्षा आहे

विमानसेवा पुन्हा सुरु करण्याच्या JKG च्या निर्णयात कोणताही बदल झालेला नाही, असे कन्सोर्टियमच्या निवेदनात म्हटले आहे. जेकेजीने सांगितले की, 2024 मध्ये जेट एअरवेजचे ऑपरेशन सुरु करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

येत्या आठवड्यात त्याच्या ऑपरेशनशी संबंधित घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. कन्सोर्टियमने गेल्या आठवड्यात जेट एअरवेजमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

Jet Airways
300 रुपये पगार ते Jet Airways ची मालकी, नरेश गोयल यांच्या पतनाची इनसाइड स्टोरी

दुसरीकडे, एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेजने 124 विमानांसह 65 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर उड्डाण केले. एसबीआयच्या नेतृत्वाखालील जेट एअरवेजच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्स (सीओसी) ने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) सांगितले होते की, एअरलाइन बंद करणे हे एक चांगले पाऊल असेल, कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा निधी नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com