जगभरात कंपन्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. शेअर बाजारात अस्थिरतेच्या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. एकीकडे जेट एअरवेज पुन्हा सुरु करण्याची योजना असताना या कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. तर काही त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी 1 डिसेंबरपासून या उपाययोजना करण्यात येणार आहेत. जेट एअर लाईन्सचे अडीचशे कर्मचारी आहेत. त्यापैकी कुणालाही नोकरीवरून (Job) काढण्यात येणार नाही. पण काही जणांना बिनपगारी सुट्टी देण्यात आली आहे तर अनेकांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. 2019 मध्ये कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजची सेवा बंद करण्यात आली. गेल्या वर्षी जेट एअरवेज (Jet Airways) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आणि त्याला मान्यताही मिळाली आहे.
मिलालेल्या माहितीनुसार जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. सीईओ आणि सीएफओच्या पगारात जास्त कपात करण्यात येणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात तात्पुरती कपात तसेच काही लोकांना बिनपगारी रजेवर 1 डिसेंबरपासून पाठवण्यात येणार आहे.
जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर यांनी ट्विट करत लिहिले, कंपनीतील 10 टक्क्याहून कमी कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय तात्पुरत्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. तसेच एक तृतीयांश कर्मचारी तात्पुरत्या वेतन कपातीवर असतील. सीईओ संजीव कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तृतीयांश कर्मचार्यांवर कोणताही परिणाम झालेला नाही किंवा कोणत्याही कर्मचार्याला कंपनी सोडण्यास सांगितले गेले नाही. जेट एअरवेजमध्ये सध्या 250 कर्मचारी काम करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.