Anil Ambani च्या Reliance Capital चे मूल्य Zero! गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण

Reliance Capital: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Anil Ambani
Anil AmbaniDainik Gomantak
Published on
Updated on

Reliance Capital: तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सचे मूल्य झिरो झाले आहे. रिलायन्स कॅपिटल ही अनिल अंबानींच्या (Anil Ambani) रिलायन्स समूहाची कंपनी आहे. सध्या यामध्ये ट्रेडिंग बंद करण्यात आले आहे, तसेच सर्व शेअर्स डिमॅटमधून डेबिट करण्यात आले आहेत.

सार्वजनिक शेअरहोल्डिंग 94% पेक्षा जास्त

रिलायन्स कॅपिटलमध्ये (Reliance Capital) सार्वजनिक शेअरहोल्डिंग 94% पेक्षा जास्त होती. याचा सरळ अर्थ असा होतो की, किरकोळ गुंतवणूकदार त्यात अधिक होते. त्यांनाही सर्वाधिक फटका बसला आहे. आरबीआयने (RBI) रिलायन्स कॅपिटलविरुद्ध एनसीएलटीकडे धाव घेतली होती. रिलायन्स कॅपिटलला दिवाळखोर घोषित करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

Anil Ambani
Anil Ambani: कर्जात बुडालेली कंपनी खरेदी करण्यासाठी 4 कंपन्यांनी दाखवले स्वारस्य!

मूल्य शून्य झाल्यानंतर गुंतवणूकदार नाराज

रिलायन्स (Reliance) ग्राहकांना कॅपिटल फायनान्सशी संबंधित सेवा पुरवते. मिडकॅप 50 चा भाग असलेली ही कंपनी लाइफ आणि आरोग्य विम्याशी संबंधित सेवा पुरवते. याशिवाय रिलायन्स कॅपिटलने कमर्शियल, होम फायनान्स, इक्विटी आणि कमोडिटी ब्रोकिंग यांसारख्या क्षेत्रातही सेवा पुरवल्या आहेत. या शेअर्सचे मूल्य झिरो झाल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

दुसरीकडे, रिलायन्स कॅपिटल दीर्घकाळापासून कर्जात बुडाली आहे. बुधवारी एका समितीने कंपनीच्या ठराव प्रक्रियेचा आढावा घेतला. इंडसइंड बँक, ओक्ट्री कॅपिटल आणि टोरेंट ग्रुपसह सहा कंपन्यांनी रिलायन्स समूहाची ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी बोली लावली होती, ही प्रक्रिया 29 ऑगस्टला पूर्ण झाली होती. रिलायन्स कॅपिटलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, कंपनीच्या कर्जदारांची 18 वी बैठक मुंबईत झाली.

Anil Ambani
Anil Ambani यांना इनकम टॅक्सची नोटीस! 814 कोटींची संपत्ती लपवल्याचा आरोप

तसेच, रिलायन्स नेव्हल आणि इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्येही व्यवहार थांबवण्यात आला आहे. ही कंपनी इसॉल्नसी अ‍ॅण्ड बॅंक करप्सी कोडमधून जात आहे. या कारणास्तव, हे समभाग एडिशनल सर्विलान्स मेजर उपाय (ASM) मध्ये ठेवले आहेत. एएसएममध्ये आल्यानंतर या शेअर्समध्ये आठवड्यातून एकदाच ट्रेडिंग करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com