Banking Sector Net Profit: मोदी सरकारच्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल; पहिल्यांदाच नफा 3 लाख कोटींच्या पार!

Banking Sector Net Profit: एकीकडे जगातील महासत्ता आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकत चालली आहे, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.
PM Modi
PM ModiPM X Handle

Banking Sector Net Profit: एकीकडे जगातील महासत्ता आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकत चालली आहे, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत रेटिंग एजन्सी आणि IMF यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्याचवेळी, भारतीय बँकिंग क्षेत्राबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात भारतीय बँकिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणला.

बँकिंग क्षेत्राने इतिहास रचला

दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय बँकिंग क्षेत्राने 2023-24 या आर्थिक वर्षात 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सूचीबद्ध बँकांचा निव्वळ नफा 39% ने वाढून 3.1 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचला आहे. तर 2023 या आर्थिक वर्षात बँकांचा निव्वळ नफा 2.2 लाख कोटी रुपये होता. खाजगी क्षेत्रातील बँकांनी 1.4 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

PM Modi
State Bank of India FD Scheme: SBI ने ग्राहकांना पुन्हा दिली खूशखबर, 'या' योजनेत आता जबरदस्त फायद्यांसह...

10 वर्षांत भारतीय बँकींग क्षेत्राचा कायापालट झाला

बँकिंग क्षेत्राच्या विक्रमी नफ्याबद्दल ट्विट करताना, पीएम मोदींनी लिहिले की, ‘’गेल्या 10 वर्षांत भारताच्या बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले आहेत. एनडीए सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय बँकांवर एनपीएचा प्रचंड दबाव होता. यूपीएच्या फोन-बँकिंग धोरणामुळे भारतीय बँकांना प्रचंड तोटा आणि मोठ्या एनपीएचा सामना करावा लागला. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते.’’

ते पुढे म्हणाले की, ‘’भारतीय बँकांच्या आरोग्यात झालेल्या सुधारणेमुळे गरीब, शेतकरी आणि एमएसएमईंना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यात मदत झाली. आता खाजगी क्षेत्रासह भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा वाढला आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com