Pakistan Attack: चिनी क्षेपणास्त्रांमुळे पाकचा पराभव निश्‍चित! तुर्कीचे विमान, शस्त्रे लगेच वापरता येणार नाही; मेजर बाम यांचा दावा

Anil Bam: सध्या पाक वापरत असलेली क्षेपणास्त्रे चिनी बनावटीची असल्याने पाकिस्तानला पराभव निश्चित असल्याचे कळून चुकले आहे असे बाम म्हणाले.
Anil Bam About War
Anil BamDainik Gomantak
Published on
Updated on

नागपूर: ‘‘तुर्कियेचे विमान व त्यांनी कथितरित्या पाठवलेली शस्त्रास्त्रांची मदत पाकला मिळाली तरी ती विमाने आणि शस्त्रे त्यांना लगेच वापरता येणार नाहीत. त्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे,’’ असे मत मेजर जनरल (निवृत्त) अनिल बाम यांनी नमूद केले.

पाक सैन्याच्या सध्याच्या अवस्थेवर भाष्य करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर, सध्या पाक वापरत असलेली क्षेपणास्त्रे चिनी बनावटीची असल्याने पाकिस्तानला पराभव निश्चित असल्याचे कळून चुकले आहे असे बाम म्हणाले.

‘‘पाकिस्तान चिनी बनावटीच्या शस्त्रांवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे एचक्यू-९ किती तकलादू आहे हे आपण पाहतो आहे. लाहोरमध्ये आठ मे रोजी काय घडले हे आपण पाहिले. पाकिस्तानी क्षेपणास्त्रे भारताने नेस्तनाबूत केल्या. देशामध्ये पडलेला त्याचे अवशेष पाहिल्यास त्यावर मेड इन चायना लिहिलेले आढळते. चिनी शस्त्रे कधीच सिद्ध नसतात. सहा-सात वर्षांपूर्वी चीनने हे शस्त्रे पाकिस्तानला पुरवले आहेत. भारताला या शस्त्रांची बनावट माहिती होती,’’ असे मेजर जनरल बाम यांनी नमूद केले.

Anil Bam About War
India Pakistan War: गोव्यात ड्रोन उडवण्यास बंदी, मच्छिमारांवरती निर्बंध! भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांकडून सज्‍जतेचा आढावा

चोरीचे तंत्रज्ञान

‘‘पाकिस्तानकडील चिनी बनावटीचे एचक्यू-९ ही हवाई संरक्षण प्रणाली इतरांकडून चोरलेल्या तंत्रावर आधारित आहे. रशियाच्या एस-३०० आणि अमेरिकेच्या पेट्रोयेट डिफेन्स सिस्टिमची कॉपी करून चीनने ते बनविले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात हेच चोरलेल्या तंत्रावर आधारित ‘एचक्यू-९’ वापरत आहे, असेही मेजर जनरल म्हणाले.

Anil Bam About War
Operation Sindoor: पाकड्यांचे नागरी वस्तीवर हल्ले, भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू; भारतानेही पाकचे 4 एअरबेस केले टार्गेट, रात्रभर काय घडलं वाचा

ते स्व-संरक्षणात तरबेज

पाकिस्तान ने काल जम्मू काश्मीरचा सीमेवर अनेक जिल्ह्यात हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नुकसान पोहोचवू शकले नाही. कारण, तिथली जनता सिव्हिल डिफेन्स (स्व-संरक्षण) बद्दल तरबेज आहे, अशी स्तुतीसुमने मेजर जनरल अनिल बाम यांनी उधळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com