Jeff Bezosच्या आलिशान क्रूझ साठी तोडला जाणार ऐतिहासिक पुल

बेझोसच्या आलिशान बोटीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी 144 वर्षे जुन्या पुलाचा मधला भाग तोडण्यात येणार आहे.
 Jeff Bezos Luxurious Boat
Jeff Bezos Luxurious BoatDainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठी दिग्गज आणि श्रीमंत ई-कॉमर्स कंपनी Amazon चे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या बोटीसाठी एक ऐतिहासिक पूल (Superyatch) तोडला जाणार आहे. या बोटीची किंमत $485 दशलक्ष आहे. ही सुपरबोट तीन मास्ट असलेली असून तिची उंची 40 मीटर आहे. पूल तोडण्याचा खर्च फक्त बेझोसच उचलणार आहे. हा पूल 1978 मध्ये बांधण्यात आला होता पण दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या बॉम्बहल्ल्यांनी तो खराब झाला होता, त्यानंतर तो पुन्हा बांधण्यात आला. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नेदरलँड्सच्या किनारी असलेल्या रॉटरडॅम शहराच्या स्थानिक सरकारने सांगितले की, बेझोसच्या आलिशान बोटीला मार्ग मोकळा करून देण्यासाठी 144 वर्षे जुन्या पुलाचा काही भाग पाडण्यात येणार आहे. ही सुपरबोट वाहून नेण्यासाठी पुलाचा मधला भाग तोडण्यात येणार आहे. हा पूल जगप्रसिद्ध हिटलरशी संबंधित आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याने त्यावर बॉम्ब टाकला होता. (Jeff Bezoss Luxurious Boat)

 Jeff Bezos Luxurious Boat
गौतम अदानींना का म्हटलं जातं 'सर्व्हायव्हर ऑफ क्रायसिस', जाणून घ्या कहाणी

2017 मध्ये करण्यात आली पुलाची दुरुस्ती

सुपरबोट नेण्यासाठी एकच मार्ग असून तो पूल काढल्याशिवाय ती क्रूझ पुढे जाणे शक्य नाही. मात्र, याबाबत स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 2017 मध्ये या पुलाची डागडुजी झाल्यानंतर पुन्हा या पुलाची कोणतीही छेडछाड होणार नाही, असे आश्वासन स्थानिक परिषदेने दिले होते. मात्र, सुपरबोट निघून गेल्यानंतर तिची पुनर्बांधणी केली जाईल, असे स्थानिक सरकारचे म्हणणे आहे.

 Jeff Bezos Luxurious Boat
प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची 2026 पर्यंत मुदतवाढ

ही बोट 417 फूट लांब

समुद्राकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या ऑपरेशनचे बिल अब्जाधीश बेझोस भरतील. जेफ बेझोस यांची बोट 417 फूट लांब आहे. त्याचे कोड नाव Y721 आहे. बेझोस त्यांच्या महागड्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. गेल्या वर्षी त्यांनी ब्लू ओरिजिन या त्यांच्या स्पेस कंपनीच्या पहिल्या पॅसेंजर फ्लाइटने अवकाशात कूच केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com