प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची 2026 पर्यंत मुदतवाढ

ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांसाठी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana scheme extended
Pradhan Mantri Kisan Sampada Yojana scheme extendedDainik Gomantak
Published on
Updated on

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana scheme extended: सरकारने प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची (PMKSY) तारीख वाढवली आहे. देशातील शेतकऱ्यांना आता येणाऱ्या काळातही या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजना 31 मार्च 2026 पर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या चार वर्षांसाठी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.

ऑगस्ट 2017 मध्ये देशात प्रधानमंत्री किसान संपदा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतीवर आधारित कामे केली जातात. देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, अन्न प्रक्रिया मंत्रालयाने सांगितले की त्यांची प्रमुख योजना 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (PMKSY) 4,600 कोटी रुपयांच्या वाटपासह मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana scheme extended
'या' 8 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ

किसान संपदा योजना 2025-26 पर्यंत वाढवली

मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले की, PMKSY 2021-22 ते 2025-26 पर्यंत वाढवण्यात आले आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी 4,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. PMKSY ही एक सर्वसमावेशक योजना आहे जी शेतीपासून किरकोळ दुकानांपर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळण्यास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

Pradhan Mantri Kisan Sampada Yojana scheme extended
अलर्ट! गुगल क्रोम यूजर्संना सायबर हल्ल्याचा धोका, सरकारने दिल्या 'या' टिप्स

ही योजना मे 2017 मध्ये सुरू झाली

केंद्र सरकारने मे 2017 मध्ये 6,000 कोटी रुपयांच्या वाटपासह संपदा (शेती-सागरी प्रक्रिया आणि कृषी-प्रक्रिया संकुलांच्या विकासासाठी योजना) योजना सुरू केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये, या योजनेचे नाव बदलून PMKSY करण्यात आले. या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकीकरणाला चालना देण्यावर सरकारचा भर आहे. अशा परिस्थितीत या सरकारी योजनेतून देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com