गौतम अदानींना का म्हटलं जातं 'सर्व्हायव्हर ऑफ क्रायसिस', जाणून घ्या कहाणी

गौतम अदानी (Gautam Adani) यांना सर्व्हायव्हर ऑफ क्रायसिस म्हटले जाते. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर अदानी यांचे 1998 मध्ये काही लोकांनी अपहरण केले होते.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी संपत्तीमध्ये मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, ते जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 88.5 अब्ज डॉलर आहे, तर मुकेश अंबानी आता 11 व्या स्थानावर घसरले आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 87.9 अब्ज डॉलर आहे. या वर्षात आतापर्यंत गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत 12 अब्ज डॉलरने वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची या काळात 2 अब्ज डॉलर एवढी संपत्ती झाली आहे. अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात आतापर्यंत जगातील टॉप 500 अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. (Gautam Adani Is Called The Survivor Of Crisis)

दरम्यान, गौतम अदानी यांना सर्व्हायव्हर ऑफ क्रायसिस (Survivor Of Crisis) म्हटले जाते. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर अदानी यांचे 1998 मध्ये काही लोकांनी अपहरण केले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अपहरणाच्या घटनेत त्यांच्या कुटुंबाकडून 2 दशलक्ष डॉलर्सची मागणी करण्यात आली होती. पैसे मिळाल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली होती. तसेच, ज्यांच्यावर अपहरणाचा आरोप होता ते पुराव्याअभावी निर्दोष सुटले. 2008 मध्ये मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी अदानी मुंबईतील (Mumbai) ताज हॉटेलमध्ये थांबले होते. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा ते हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते आणि त्यांनीही दहशतवाद्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांनी शेकडो लोकांसह तळघरात लपून कसा तरी जीव वाचवला. यामुळेच अदानी यांना सर्वायव्हर ऑफ क्रायसिस म्हटले जाते.

Gautam Adani
Stocks vs Mutual Funds: योग्य ठिकाणी गुंतवणुक आणि अधिक परतावा

मार्च 2020 मध्ये संपत्ती फक्त 5 अब्ज डॉलर्स होती

गौतम अदानी यांच्यासाठी कोरोना काळ उत्तम केला. 2021 मध्ये त्याच्या संपत्तीत 42 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली. ब्लूमबर्गच्या मते, मार्च 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती फक्त $ 5 अब्ज होती. 2020 मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत 20 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली होती.

योग्य सेक्टरमध्ये योग्य वेळी प्रवेश घेतला

ऑस्ट्रेलियातील (Australia) कोळसा खाण वादामुळे गेल्या काही वर्षांपासून गौतम अदानी सतत चर्चेत होते. क्लाइमेटएक्टिविस्ट ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) यांनी यास विरोध केला होता. त्यानंतर अदानी यांनी जीवाश्म इंधनाऐवजी इतर व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. अदानी समूहाचा व्यवसाय अक्षय ऊर्जा, विमानतळ, डेटा सेंटर्स, संरक्षण क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणतात की, गौतम अदानी यांनी बदलत्या काळात योग्य वेळी योग्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.

Gautam Adani
Retirement Fund Tips: पैसे साठवताना 'या' चुका करणे टाळा

अक्षय ऊर्जेवर विशेष लक्ष

अदानी ग्रुप ऑफ कंपनीजने गेल्या दोन वर्षांत 600-700 टक्के परतावा दिला आहे. अदानी सध्या अक्षय ऊर्जा व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. गौतम अदानी यांनी नुकतेच सांगितलं होतं की, 2030 पर्यंत आम्ही अक्षय ऊर्जेमध्ये $ 70 अब्ज गुंतवणूक करणार आहेत. अदानी समूह जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा उत्पादक बनण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

अदानी समूहाच्या समभागांनी कोरोनाच्या काळात कामगिरी केली

कोरोनाच्या काळात अदानी समूहाच्या शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर अदानी टोटल गॅसमध्ये 1000 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 730 टक्क्यांनी, अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये 500 टक्क्यांनी, अदानी पोर्टच्या शेअरमध्ये 95 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात सेन्सेक्स 40 टक्क्यांनी वधारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com