GST On Rent: जीएसटीबाबत सातत्याने बातम्या येत असतात. जुलै महिन्यात जीएसटीचे नवीन नियमही लागू करण्यात आले आहेत. तुम्ही जर कोणत्याही निवासी मालमत्तेत भाड्याने राहत असाल, तर तुम्हाला भाड्याच्या व्यतिरिक्त 18% GST भरावा लागेल. खरंतर ही बातमी पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. रेंट व्यतिरिक्त भाडेकरुला 18% जीएसटी देखील भरावा लागेल, असे सांगितले जात आहे. नवीन अपडेट्स जाणून घेऊया.
दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) ही बातमी पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. रेंट व्यतिरिक्त भाडेकरुला 18% जीएसटी देखील भरावा लागेल. यातच पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल मेसेजची सत्यता तपासली आहे. यानंतर पीआयबीने ही बातमी खोटी ठरवली. पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले की, घर भाड्यावर 18% जीएसटीची (GST) बातमी पूर्णपणे चुकीची आहे. एवढेच नाही तर यावर आता सरकारचे वक्तव्यही समोर आले आहे.
सरकारने स्पष्टीकरण दिले
याआधी एका ट्विटमध्ये पीआयबीने म्हटले की, "निवासी युनिटचे भाडे तेव्हाच करपात्र आहे, जेव्हा ती जागा व्यवसाय करण्यासाठी जीएसटी नोंदणीकृत कंपनीला भाड्याने दिली जाते." पुढे असेही स्पष्ट करण्यात आले की, जर एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक वापरासाठी ती जागा भाड्याने घेतली असेल तर त्यावर जीएसटी भरावा लागणार नाही.
काय आहे नियम माहित?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायासाठी निवासी मालमत्ता भाड्याने दिली, तर त्याला जीएसटी भरावा लागेल. पूर्वी, जेव्हा कोणी व्यावसायिक कामासाठी कार्यालय किंवा इमारत भाडेतत्त्वावर घेत असे, तेव्हाच त्याला भाडेपट्टीवर जीएसटी भरावा लागायचा. वास्तविक जीएसटीच्या बैठकीपासूनच लोक वाढलेल्या दराविरोधात आंदोलन करत आहेत.
तज्ञांनी परिस्थिती स्पष्ट केली
तज्ज्ञांच्या मते, जर सामान्य पगारदार व्यक्तीने निवासी घर किंवा फ्लॅट भाड्याने घेतला असेल तर त्याला जीएसटी भरावा लागत नाही. तर जीएसटी-नोंदणीकृत व्यक्ती किंवा व्यवसाय करत असलेली संस्था, त्यांनी निवासी घर किंवा फ्लॅट भाड्याने घेतल्यास, मालकाला भाड्यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.