आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री बसणार आहे. आजपासून म्हणजे 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये (GST) वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. जीएसटी काऊंसिलने (GST Council) आजपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून कोणकोणत्या वस्तू महागणार आहेत हे जाणून घेउया.
* पॅकेट बंद सामानांवर 18 टक्के जीएसटी
आजपासून पॅकेट बंद वस्तुंवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. याआधी पॅकेट बंद वस्तुंवर फक्त 5 टक्के जीएसटी लागू होता. याशिवाय नारळ पाणी आणि फुटवेअरच्या कच्च्या मालावरही 12 टक्के जीएसटी लागणार आहे.
* 'या' वस्तूंवर पाच टक्के जीएसटी
मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाना, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता पाच टक्के जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.
'या' वस्तूंना मिळणार जीएसटीमधून सूट
*अनपॅक केलेल्या वस्तु
* लेबर नसलेल्या वस्तु
* ब्रॅंड नसलेल्या वस्तु
* आरोग्यसेवा महागणार
रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
* शैक्षणिक वस्तू देखिल महागणार
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंगबुक, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.