Privatisation: बँक खाजगीकरणावर मोठी अपडेट, हा गट सादर करणार EoI; अर्थमंत्र्यांची माहिती!

Bank Privatisation Latest News: बँकांच्या खाजगीकरणासाठी सरकार वेगाने काम करत आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala SitharamanDainik Gomantak

Bank Privatisation News: बँकांच्या खाजगीकरणासाठी सरकार वेगाने काम करत आहे. लवकरच दुसरी सरकारी बँक खाजगी बनवण्याचे काम केले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात याबाबत माहिती दिली होती. देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार अनेक बदल करत आहे. आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी मार्चपर्यंत निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे.

मार्चपर्यंत निविदा मागवल्या जातील

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम ग्रुप आयडीबीआय बँकेच्या संभाव्य बोलीसाठी काम करत आहे. मार्चपर्यंत निविदा मागवण्याची शक्यता असल्याचे सरकारने म्हटले आहे. श्रीराम ग्रुप लवकरच यासाठी ईओआय सादर करु शकेल.

Finance Minister Nirmala Sitharaman
IDBI Bank Privatisation: आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा

गट स्वतंत्र होल्डिंग सेट करु शकतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूत्रांनी सांगितले की, श्रीराम ग्रुप एक फायनान्सर आहे, ज्याचे मुख्यालय चेन्नईमध्ये आहे. सध्या, हा समूह IDBI बँकेच्या खाजगीकरणात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र होल्डिंग कंपनी स्थापन करु शकतो.

श्रीराम ग्रुपचा व्यवसाय काय आहे?

आर त्यागराजन यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम समूह सध्या व्यावसायिक वाहन वित्तपुरवठा, दुचाकी वित्तपुरवठा तसेच लहान आणि मध्यम व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत आहे. श्रीराम समूह IDBI बँकेसाठी बोलीदार म्हणून एक व्यासपीठ तयार करु शकतो.

Finance Minister Nirmala Sitharaman
LPG Cylinder Price: मोठी बातमी, दिवाळीपूर्वी स्वस्त होणार सिलिंडर; सरकारने केला हा प्लॅन!

खाजगीकरण दोन टप्प्यात होणार आहे

आयडीबीआय बँकेचे (IDBI Bank) दोन टप्प्यात खाजगीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यात स्वारस्य असलेल्यांकडून प्रथम ईओआय सादर केला जाईल. तर RBI खाजगीकरण प्रक्रियेतील सहभागींच्या पात्रतेचे मूल्यांकन करेल.

सरकार हिस्सा विकणार आहे

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) कडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि LIC IDBI बँकेतील सुमारे 60.72 टक्के हिस्सेदारी विकत आहेत. त्यांच्याकडे बँकेचा 94.72 टक्के हिस्सा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com