मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) जेव्हापासून जिप्सी बंद केली तेव्हापासून, प्रत्येकजण महिंद्र थारच्या पुढील एसयूव्हीची वाट पाहत आहे. जिमनी भारतात येणार असल्याची अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती मात्र आता अलीकडेच नवीन महिंद्रा सुझुकीचे 5-दरवाजा असणारे जिमनीचे मॉडेल युरोपमध्ये चाचणीदरम्यान दिसून आले आहे. सुझुकी या वर्षाच्या अखेरीस जागतिक बाजारपेठेसाठी जिमनी लाँच करू शकते आणि यानंतर ते भारतात येणे अपेक्षित आहे. (Maruti Suzuki Jimny may launch soon)
रिपोर्टनुसार सुझुकी जिमनी आकाराने खूप मोठी असणार आहे. शॉर्ट-व्हीलबेस प्रकारातील 3,470 मिमीच्या तुलनेत आता त्याची लांबी 3,840 मिमी असणार आहे. त्याचा व्हीलबेसही अधिक आहे. एसयूव्हीची रुंदी आणि उंची तीन-दरवाजा मॉडेलसारखीच असण्याची शक्यता आहे. सुझुकी लाँग-व्हीलबेस जिमनीची पॉवरट्रेन देखील अपग्रेड करणार आहे.
डिझाईन आणि परिमाण
चाचणी दरम्यान दिसून आलेली जिमनीची डिझाईन लपवण्यात आली होती. कारच्या लांबीसोबत पुढील बाजूस, लोखंडी जाळी आणि मोठे गोल हेडलॅम्प दिसून येऊ शकतात. मागील बाजूस देखील, शॉर्ट-व्हीलबेस जिमनी सारखेच आहे आणि दोन्ही बाजूला टेल लॅम्प आहेत.
त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, सुझुकी संकरित तंत्रज्ञानासह 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे. पूर्वीचे 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड युनिट यूकेमध्ये बंद करण्यात आले आहे. जिमनीच्या चाचणी युनिटला काळ्या आणि पांढऱ्या झेब्रा पॅटर्नच्या कव्हरमध्ये झाकण्यात आले असले तरी, तर स्पाय शॉट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
इंटिरिअर प्रेक्षणीय असणार आहे. 5-दरवाज्यांच्या जिमनीच्या इंटिरिअरबद्दल महत्त्वाचे तपशील समोर आले आहे. नवीन SUV अपग्रेड केलेल्या 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येणार आहे. व्हीलबेस आणि एकूण लांबीच्या विस्तारामुळे केबिनची जागाही आधीच्या मॉडेलपेक्षा मोठी असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.