Subsidy for Green House: ग्रीन हाऊससाठी सरकार देतेय 70 टक्के अनुदान

स्वतःची शेतीयोग्य जमिन असणे गरजेचे
Subsidy for Green House:
Subsidy for Green House:Dainik Gomantak
Published on
Updated on

Subsidy for Green House: ग्रीनहाऊस किंवा हरितगृहातील शेती हा विषय आता नवा राहिलेला नाही. गेल्या काही वर्षात अनेक शेतकरी ग्रीनहाऊस शेतीकडे वळले आहेत आणि त्यातून त्यांनी चांगले उत्पादन घेत नफा मिळवला आहे.

Subsidy for Green House:
Mahadayi Water Dispute: अखेर, गोव्याला कर्नाटककडून मिळाली म्हादई डीपीआरची प्रत

ग्रीनहाऊसमधील शेतीमाल तीव्र उन्हापासून संरक्षित असतो. त्यामुळे ग्रीनहाऊसमधील पिकाचे हवामान आणि कीटकांमुळे होणारे नुकसान टळते. त्यामुळे सरकारही शेतकऱ्यांना ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करत आहे. याचाच एक भाग म्हणून राजस्थानातील शेतकऱ्यांनाही हरितगृह उभारण्यासाठी अनुदान दिले जात आहे.

या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला किमान 4000 चौरस मीटरचे हरितगृह उभारावे लागणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत, राजस्थानमधील शेतकऱ्यांना हरितगृह उभारणीच्या खर्चावर 50 ते 70 टक्के कर अनुदान दिले जात आहे.

सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना हरितगृहाच्या युनिट किमतीवर 50 टक्के अनुदान दिले जाईल. लहान, अत्यल्प, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 20 टक्के अधिक म्हणजे युनिट खर्चावर 70 % अनुदान दिले जाईल.

Subsidy for Green House:
Goa Traffic Police : कारवाई 900ची पण पावती 500 रुपयांची; गोव्‍याची बदनामी

या योजनेसाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती योग्य जमीन असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला रहिवासी दाखलाही जोडावा लागेल. शेततळ्यात सिंचनाची व्यवस्था असावी. माती, पाणी चाचणीचा अहवाल तसेच जात प्रमाणपत्रही जोडावे लागणार आहे.

rajkisan.rajasthan.gov.in या वेबसाटईवर अर्ज करता येईल. राजस्थान सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://dipr.rajasthan.gov.in/ वर तपशील देखील दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com