Gold Silver Price Hike: नवा उच्चांक! सोन्याचे भाव गगनाला भिडले, चांदीही तेजीत; जागतिक व्यापार युद्धाचा भारतीय बाजाराला तडाखा

Gold Silver Price Today 2026: सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, 19 मार्चच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 2.55 टक्क्यांच्या वाढीसह 2,67,400 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
Gold Silver Price Today 2026
Gold Silver Price HikeDainik Gomantak
Published on
Updated on

Gold, Silver Prices Rise : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (25 फेब्रुवारी) भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सकाळी 10 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास 2 एप्रिल रोजीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव मागील सत्राच्या तुलनेत 0.42 टक्क्यांनी वधारुन 1,60,626 रुपये प्रति 10 ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला.

सोन्यासोबतच (Gold) चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, 19 मार्चच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 2.55 टक्क्यांच्या वाढीसह 2,67,400 रुपये प्रति किलोवर पोहोचला. वायदा बाजारातील या तेजीमुळे सराफा बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Gold Silver Price Today 2026
Gold Silver Price: सुवर्णवार्ता… सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! बजेटनंतर भाव उतरल्याने ग्राहकांची चांदी, जाणून घ्या आजचे नवे दर

दुसरीकडे, देशातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या हाजिर भावातही (Spot Price) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 'गुडरिटर्न्स'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 16,204 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला, तर 22 कॅरेटसाठी 14,855 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 12,157 रुपये प्रति ग्रॅम मोजावे लागत आहेत.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,189 रुपये प्रति ग्रॅम असून 22 कॅरेटसाठी 14,840 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 12,142 रुपये दर आहे. कोलकाता आणि बंगळुरुमध्येही सोन्याचे दर मुंबईच्या बरोबरीनेच म्हणजे 24 कॅरेटसाठी 16,189 रुपये प्रति ग्रॅम इतके नोंदवले गेले आहेत. चेन्नईमध्ये मात्र सोन्याचे भाव सर्वाधिक असून तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर 16,288 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेटसाठी 14,930 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 12,765 रुपये प्रति ग्रॅम असा आहे.

Gold Silver Price Today 2026
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किमती सुमारे 5,180 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचल्या आहेत, ज्यामुळे मागील सत्रात झालेली घसरण भरुन काढण्यात यश आले आहे. या तेजीमागे प्रामुख्याने जागतिक व्यापार युद्ध आणि भू-राजकीय अनिश्चितता ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले नवीन 10 टक्के जागतिक शुल्क मंगळवारपासून अंमलात आले आहे.

ट्रम्प प्रशासनाची योजना हे शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आहे, जेणेकरुन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले काही शुल्क पुन्हा लागू करुन आपला व्यापार अजेंडा मजबूत करता येईल. ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला होता की, ज्या देशांनी अलीकडच्या व्यापार करारांशी "खेळ" केला आहे, त्यांच्यावर अधिक दंडात्मक शुल्क लादले जाऊ शकते. ट्रम्प यांच्या या आक्रमक धोरणामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढला आहे.

Gold Silver Price Today 2026
Gold-Silver Prices: सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ! लग्नसराईत ग्राहकांना घाम; एका दिवसात चांदीच्या दरात 'इतक्या' हजारांची वाढ

मात्र, सोन्यामधील ही तेजी एका विशिष्ट मर्यादेत राहण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून नजीकच्या भविष्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता धूसर झाली आहे. मंगळवारी फेडरल रिझर्व्हच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या चलनविषयक धोरणात तातडीने बदल करण्याची गरज नाही.

अमेरिकेतील (America) लेबर मार्केटमध्ये सुधारणा होत असून महागाईचा दर स्थिर आहे, त्यामुळे व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर पडू शकतो. डॉलरचा मजबूत भाव आणि फेडरल रिझर्व्हची ही भूमिका सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण करत आहे. तरीही ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे निर्माण झालेली अनिश्चितता सोन्याला आधार देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com