Gautam Adani Networth: गौतम अदानींची स्‍ट्रॅटजी जगातील अब्जाधीशांवर भारी, 24 तासांत कमावले 24825 कोटी!

Adani Companies Share Price: हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा गौतम अदानी यांच्याकडे लागल्या होत्या.
Gautam Adani Networth
Gautam Adani NetworthDainik Gomantak

Adani Companies Share Price: हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नजरा गौतम अदानी यांच्याकडे लागल्या होत्या.

रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावेळी अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली होती. पण आता हळूहळू अदानींची नेटवर्थ वाढत आहे.

समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एक दिवसापूर्वी जगातील अब्जाधीशांना मागे सोडले. त्यांच्या संपत्तीत 3.03 अब्ज डॉलर्स (सुमारे 25000 कोटी) ची वाढ दिसून आली.

यासह गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 63.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

जगातील 19 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती

समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे अदानींच्या एकूण संपत्तीत ही वाढ झाली आहे. यामुळेच समूहाच्या मार्केट कॅपमध्येही 50,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी सध्या जगातील श्रीमंतांच्या यादीत 19 व्या स्थानी आहेत. मंगळवारी एक दिवस आधी ते सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश होते.

अदानी समूह (Adani Group) देशात ऊर्जा, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रात आहे. बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $95.3 अब्ज आहे.

Gautam Adani Networth
Gautam Adani: अदानी अभी जिंदा है! अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानींचे शानदार पुनरागमन

हिंडेनबर्ग संशोधनाचा मुद्दा...

हिंडेनबर्ग संशोधनाचा मुद्दा मागे पडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये रस घेत आहेत.

मंगळवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

हिंडेनबर्ग रिपोर्टपूर्वी, समूहाचे मार्केट कॅप 19.20 लाख कोटी रुपये होते. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर आरोप झाल्यानंतर शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली होती.

पण आता देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या हितसंबंधामुळे शेअरची किमतीत वाढ दिसून येत आहे.

Gautam Adani Networth
Gautam Adani : गौतम अदानी टॉप-30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींकडे शिल्लक राहिली 'एवढीच' संपत्ती

रिअलटाइम बिलियनेअर इंडेक्समध्ये, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कच्या (Elon Musk) संपत्तीत $2.70 अब्जची घट झाली आहे.

मस्कची एकूण संपत्ती 236 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. मस्कच्या संपत्तीत झालेली घसरण टेस्लाच्या समभागातील घसरणीमुळे झाली.

टेस्लाच्या स्टॉकमध्ये 4% ची घसरण नोंदवली गेली आहे. मस्क व्यतिरिक्त जगभरातील इतर श्रीमंत लोकांच्या संपत्तीतही मंगळवारी घट झाली.

तथापि, जेफ बेझोस, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मर, लॅरी पेज, मार्क झुकेरबर्ग, सर्जे ब्रिन आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी वाढ झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com