

Five features of ChatGPT, which will be a booster for startups:
तुम्हाला आवडो किंवा न आवडो, आज AI सर्वत्र आहे. आणि हे सर्व ChatGPT च्या प्रचंड लोकप्रियतेमुळे घडत आहे.
OpenAI ने बनवलेला जनरेटिव्ह AI चॅटबॉट नोव्हेंबर 2022 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून, IT, आरोग्यसेवा, शिक्षण आणि यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्याच्या अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
ChatGPT हे खरोखर फायदेशीर साधन आहे की तंत्रज्ञानाचा अमर्याद हस्तक्षेप यावर अजूनही वाद विवाद चालू आहेत. अशात स्टार्टअप्स आणि अनेक उद्योग विश्वात AI टूल्स आणि प्लगइन्सचा शोध आणि वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.
प्लगइन हा सॉफ्टवेअर प्रोग्राम्सचा एक घटक आहे, जो काही विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी आणि कार्यक्षमतेसाठी जोडला जातो, हा अशा सॉफ्टवेअरचा एक छोटासा भाग असतो, जो दुसर्या सॉफ्टवेअरमध्ये विशिष्ट कार्यक्षमता जोडण्यासाठी प्लग इन केला जातो. यामुळे त्याला प्लगइन म्हणतात.
प्लगइन हे एक प्रकारचे लहान सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही मोठ्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन कार्यक्षमता जोडू शकतो.
स्टार्टअप्ससाठी टॉप 5 चॅटजीपीटी प्लगइन्स
हे अतिशय उपयुक्त ChatGPT प्लगइन आहे जे Gmail, Slack, Notion, Discord इत्यादी 5,000 हून अधिक अॅप्ससह एकत्र होत स्टार्ट अप्सना त्यांचे काम सुरळीत चालवण्यासाठी मदत करते. यूजर्स त्याचे रिअल-टाइम निरीक्षण करुन Google ड्राइव्ह, ईमेल, वर्कफ्लोचे व्यवस्थापन करू शकतात. .
क्राफ्टफुल एआय टूल स्टार्टअप संस्थापक आणि उत्पादकांसाठी फायदेशीर आहे. कारण याद्वारे उत्पादने सुधारण्यासाठी मदत होऊ शकते.
उदाहरणार्थ, क्राफ्टफुल ग्राहकांच्या उत्पादनाविषयीच्या शंका आणि तक्रारी समजावून घेते आणि उत्पादने सुधारण्यास मदत करते.
शो मी हे एक स्मार्ट एआय टूल आहे जे लोकांना त्यांचे विचार स्पष्टपणे मांडण्यास मदत करते. हे ChatGPT प्लगइन वापरून, यूजर्स टेक्स्ट प्रॉम्प्टसह रिअल-टाइम चित्र तयार करू शकतात. हे गुंतागुंतीची माहिती एकत्रित करून त्याचे एका साध्या चित्रात रूपांतर करते.
तुम्ही ChatGPT वापरण्यासाठी अगदी नवीन असाल, तर हे टूल तुम्हाला सर्वोत्तम प्रॉम्प्ट बनवण्यात मदत करेल. प्रॉम्प्ट म्हणजे मोबाइल किंवा कंप्युटरवर एखादी गोष्टी व्हाइस सर्चच्या माध्यातून शोधने. हे ChatGPT कडून उच्च-गुणवत्तेची माहिती मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते. याद्वारे अगदी सोशल मीडिया पोस्ट करण्यापासून ते कोड लिहिण्यापर्यंत कामे सोप्या पद्धतीने करता येतात.
मार्केट रिसर्च हा बिझनेस मॅनेजमेंटचा आवश्यक भाग आहे. ग्राहकांविषयी संशोधन करण्यासाठी, स्टार्टअप्स सर्वेक्षण व अभिप्राय यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतात.
याय! फॉर्म हे एक असे AI टूल आहे जे कंपन्यांना डेटा कार्यक्षमतेने गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी प्रश्नावली किंवा सर्वेक्षण करण्यात मदत करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.