EPFO: पीएफधारकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीनंतरही पीएफ खात्यावर मिळणार व्याज; ईपीएफओ आणणार नवा ‘सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन’?

Epfo Systematic Withdrawal Plan Swp After Retirement: नोकरीदरम्यान कर्मचारी आपल्या वेतनातील ठराविक हिस्सा कर्मचारी भविष्य निधीमध्ये जमा करतात, जेणेकरुन निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी.
Epfo Systematic Withdrawal Plan Swp After Retirement
EPFODainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Epfo Systematic Withdrawal Plan Swp After Retirement: नोकरीदरम्यान कर्मचारी आपल्या वेतनातील ठराविक हिस्सा कर्मचारी भविष्य निधीमध्ये जमा करतात, जेणेकरुन निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी. सध्या निवृत्तीच्या वेळी पीएफची संपूर्ण रक्कम एकदम काढण्याचा पर्याय उपलब्ध असतो, मात्र आता कर्मचारी भविष्य निधी संघटना या रचनेत मोठा बदल करण्याची तयारी करत आहे.

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पीएफ निधीतून टप्प्याटप्प्याने रक्कम काढण्याची सुविधा देण्यासाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याला मंजुरी मिळाल्यास निवृत्तीनंतरही जमा रक्कम पीएफ खात्यात गुंतवलेली राहू शकेल आणि त्यावर व्याज मिळत राहील. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आपल्या गरजेनुसार निवृत्ती निधीचे नियोजन करता यावे, यासाठी अधिक पर्याय देण्याचा विचार सुरु असून, याबाबत ईपीएफओच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक होत आहे.

Epfo Systematic Withdrawal Plan Swp After Retirement
EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या दुरुस्त करा पीएफ खात्यातील चुका; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

सध्याच्या नियमांनुसार, 55 वर्षेकिंवा त्याहून अधिक वयात निवृत्त झाल्यास 100 टक्के ईपीएफ रक्कम एकरकमी काढता येते, तर पूर्ण मासिक निवृत्ती वेतनासाठी 58 वर्षे वयाची अट आहे. 55 वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यास फॉर्म 31 द्वारे 75 टक्के रक्कम लगेच काढता येते आणि उर्वरित 25 टक्के रक्कम सलग 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतर अंतिम सेटलमेंटमध्ये मिळते. याशिवाय, कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किमान मासिक निवृत्ती वेतन 1000 रुपयांवरुन 3000 रुपये करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Epfo Systematic Withdrawal Plan Swp After Retirement
EPFO WhatsApp Service: आता 'व्हॉट्सअ‍ॅप'वरच मिळणार PF खात्याचा संपूर्ण हिशेब! जुनी बंद पडलेली खातीही होणार ऑटो-सेटल, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

ईपीएफमध्ये नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के हिस्सा ईपीएसमध्ये आणि 3.67 टक्के हिस्सा ईपीएफमध्ये जमा होतो. सप्टेंबर 2014 पासून किमान 1000 रुपये निवृत्ती वेतनाची तरतूद असून, वास्तविक पेन्शन त्याहून कमी असल्यास फरकाची रक्कम केंद्र सरकारकडून अनुदानाद्वारे दिली जाते. या संभाव्य निर्णयांमुळे कोट्यवधी नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.