

EPFO Online Joint Declaration PF Correction: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली. अनेकदा पीएफ खात्यामध्ये नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख किंवा नोकरीत रुजू झाल्याची आणि नोकरी सोडल्याची तारीख यामध्ये लहान-सहान चुका राहतात, ज्यामुळे भविष्यात पीएफ क्लेम अडकणे किंवा जुनी रक्कम नवीन खात्यात हस्तांतरित होण्यात अडचणी निर्माण होतात.
या सर्व त्रासातून सुटका करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांसाठी ऑनलाइन 'जॉइंट डिक्लेरेशन'ची उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिली. आता यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज नसून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने रेकॉर्ड दुरुस्त करता येऊ शकतात.
या संयुक्त घोषणा पोर्टलच्या माध्यमातून सदस्य आपले नाव, जन्मतारीख, वडिलांचे किंवा पतीचे नाव, नोकरीत रुजू झाल्याची तारीख, नोकरी सोडल्याची तारीख आणि रोजगाराशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सुधारण्यासाठी अर्ज करु शकतात.
सर्वात आधी EPFO च्या अधिकृत मेंबर सेवा पोर्टलवर जावे.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN), पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करुन लॉगिन करावे.
पोर्टलच्या होमपेजवर वरील मेन्यूमधून ‘Joint Declaration’ या पर्यायावर क्लिक करावे.
स्क्रीनवर पीएफ खात्याशी संबंधित सद्यस्थितीची माहिती दिसेल आणि ज्या तपशिलात चूक आहे त्याची निवड करावी.
योग्य माहिती भरल्यानंतर पुराव्यासाठी पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची डिजिटल प्रत अपलोड करावी.
भरलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासून फायनल ‘Submit’ बटनावर क्लिक करावे.
अर्ज सादर झाल्यानंतर तो पडताळणीसाठी संबंधित नियोक्ता (Employer) आणि EPFO कार्यालयाकडे जाईल, जिथे मंजुरी मिळताच रेकॉर्ड अपडेट होईल. याशिवाय ईपीएफओने खातेधारकांसाठी व्हॉट्सॲप सेवा देखील सुरु केली असून याद्वारे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवून पीएफ बॅलन्स, पासबुक तपशील आणि शेवटच्या 5 ट्रान्झॅक्शनची माहिती सहज मिळवता येऊ शकते. कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्वरित ऑनलाइन जॉइंट डिक्लेरेशनद्वारे सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.