PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीवर SWP सुविधा, बेरोजगारीवर 2 महिन्यांचा नियम आणि 10 टक्के बॅलेन्स मर्यादा; ईपीएफओचे नवे नियम लागू

EPFO Meeting Decisions 2026: पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मोठे आणि दिलासादायक निर्णय घेतले.
EPFO Meeting Decisions 2026
EPFO Meeting Decisions 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

EPFO Meeting Decisions 2026: पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मोठे आणि दिलासादायक निर्णय घेतले. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मंजूर केलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावानुसार, पीएफ खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 25 टक्क्यांवरुन थेट 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. यामुळे गरजेच्या वेळी सभासदांना त्यांच्या जमा रकमेतील तब्बल 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणे शक्य होणार आहे.

दरम्यान, निवृत्तीनंतर हप्त्यांमध्ये रक्कम काढण्याची सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) योजना आणि नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांत अंतिम सेटलमेंट करण्यासारखे महत्त्वपूर्ण बदलही करण्यात आले. निवृत्तीनंतर रक्कम एकरकमी काढण्याऐवजी नियमित हप्त्यांमध्ये घेण्याची SWP सुविधा पुढील सुमारे दोन महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर पूर्वीप्रमाणेच ईपीएफओचे व्याज सुरु राहील आणि पेमेंट दरम्यान सभासदाचे निधन झाल्यास नॉमिनी किंवा कुटुंबीयांना उर्वरित रक्कम काढता येईल अथवा हप्ते सुरु ठेवता येतील.

EPFO Meeting Decisions 2026
EPFO: पीएफधारकांसाठी मोठी बातमी! निवृत्तीनंतरही पीएफ खात्यावर मिळणार व्याज; ईपीएफओ आणणार नवा ‘सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन’?

पाच लाखांपेक्षा अधिक पीएफ शिल्लक असलेल्या 55 वर्षांवरील सुमारे 6.32 लाख सभासदांना याचा थेट लाभ मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, बेरोजगारीच्या (Unemployment) काळात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी अंतिम पीएफ सेटलमेंटचा दावा नोकरी गेल्यानंतर किंवा बेरोजगार राहिल्यानंतर केवळ दोन महिन्यांनी करता येईल. ऑक्टोबर 2025 मध्ये लागू केलेला 12 महिन्यांचा कालावधी मागे घेण्यात आला असून, अंतिम पेन्शन काढण्यासाठीची किमान 36 महिन्यांची प्रतीक्षा मुदत मात्र कायम ठेवण्यात आली.

EPFO Meeting Decisions 2026
EPFO खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! आता घरबसल्या दुरुस्त करा पीएफ खात्यातील चुका; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, सभासदांना नियोक्त्याशिवाय थेट डिजिटल माध्यमातून ऐच्छिक योगदान देता यावे, या पर्यायावरही विचार करण्यात आला. तसेच टिप्स, भेटवस्तू किंवा ग्रॅच्युइटीसारख्या लहान रकमा यूएएन संलग्न पीएफ खात्यात जमा करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली असून, त्यामुळे गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि घरगुती कामगारांनाही बचतीचा फायदा मिळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.