Electric Scooter Price: या कंपनीचं 40% मार्केटवर कब्जा, दुचाकीची किंमत एक ते दीड लाख; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

ओला इलेक्ट्रिक हा सलग आठव्या महिन्यात देशातील सर्वात जास्त विक्री होणारा इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड बनला आहे.
Electric Scooter Price
Electric Scooter PriceDainik Gomantak
Published on
Updated on

Electric Scooter Price: भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंट वेगाने लोकप्रिय होत आहे. खास करुन लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यावर भर देतात.

दिग्गज खेळाडूंपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक ब्रँड इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात विकत असले तरी ओला इलेक्ट्रिकने निर्माण केलेली लोकप्रियता ही सर्वात मोठी आहे. 

ओलाच्या कॅब सेवेनंतर अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केलेल्या ओला इलेक्ट्रिकने एप्रिल महिन्यात 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. यासह, ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे. 

Electric Scooter Price
Internet In India Report 2022: इंटरनेटच्या युगात भारताने केला 'हा' अनोखा रेकॉर्ड, गोव्यात सर्वाधिक...

एप्रिल महिन्यात विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल सादर करताना ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, कंपनीने या कालावधीत एकूण 30,000 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे.

हा सलग आठवा महिना असुन ओला ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे. 

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 40 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच, उर्वरित 60 टक्के बाजारपेठ TVS, Ather Energy, Hero, Bajaj आणि Okinawa या सर्व ब्रँडच्या मालकीची आहे.

Electric Scooter Price
Ration Card: रेशनकार्डधारकांना मोठा झटका, आता मिळणार नाही मोफत रेशन; जारी झाली नवी गाईडलाइन!

ओला इलेक्ट्रिकने 30,000 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या मार्चमध्ये कंपनीने एकूण 27,000 युनिट्सची विक्री केली होती. या अर्थाने कंपनीने मासिक विक्रीच्या बाबतीत 10 टक्के वाढ नोंदवली आहे.

कंपनी देशभरात आपल्या अनुभव केंद्रांची संख्या वाढवत आहे. ओलाचा दावा आहे की त्यांचे 90 टक्के वापरकर्ते ओला एक्सपीरिएंस केंद्राच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहतात. 

  • गोव्यात किती रूपयांना मिळेल इलेक्ट्रिक बाइक

OLA S1 Pro

बॅटरीची क्षमता- 4kWh

रेंज- 181 km

स्पीड- 116 kmph

किंमत- 1,24 999

  • OLAS1

बॅटरीची क्षमता- 2Kwh

रेंज- 91 km

स्पीड- 90 kmph

किंमत- 1,14, 999

  • OlA S1 Air

बॅटरीची क्षमता- 2kWh

रेंज- 85km

स्पीड- 85 kmph

किंमत- 99,999

  • OLA इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

OLA च्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. कंपनीच्या बेस मॉडेल S1 Air ची प्रारंभिक किंमत 84,999 रुपये, S1 मॉडेलची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,24,999 रुपये आहे.

या तिन्ही स्कूटर अनुक्रमे 101 किमी, 128 किमी आणि 170 किमीच्या रेंजसह येतात. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती देखील दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com