Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ

Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ
Published on
Updated on

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालोनजी समुहाचे वारसदार सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) (वय 54) यांचे पालघरच्या चारोटी येथे अपघाती निधन झाले. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला.

या अपघातात इतर दोन लोक दगावल्याचे पोलिसांनी सांगितले, इतर दोघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मर्सिडीज गाडी रस्ता दुभाजकाला धडकल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले, सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. मिस्त्री हे वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली टाटा समूहाचे अध्यक्ष बनले होते, त्यानंतर 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते.

Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ
King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी

या अपघातामध्ये मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर, मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातच्या घरी नेले. जाणार आहे.

कार्यकाळ वादग्रस्त

सायरस मिस्त्री हे 2012 ते ऑक्टोबर 2016 या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते. मात्र, टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले होते. लंडनमधील इंपिरियल महाविद्यालयातून सायस मिस्त्री यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.

Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ
Nitesh Rane: हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी विवाहसंस्थांचे प्रोत्साहन, नितेश राणेंचा आरोप

टाटा समूहावर गंभीर आरोप

बॉसुशासन आणि पारदर्शकी व्यवस्थापनाचा आग्रह धरणाऱ्या सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. टाटा समूहाला 2019 मध्ये 13 हजार कोटींचा तोटा झाला होता. मात्र तो त्यांनी लपवला, असा आरोप मिस्त्री यांनी केला होता.

मिस्त्री यांची हकालपट्टी

तीन दशकांत पहिल्यांदाच टाटा समूहाला इतका प्रचंड तोटा झाला असून तो त्यांनी लेखा परीक्षणात दडवला, असा दावा मिस्त्री यांनी कोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात केला होता. याच वादातून 2016 साली त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. मिस्त्री यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांची हकालपट्टी योग्य ठरवली होती.

Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ
Akshay Bhangle: दिव्यांग अक्षयचे यश युवकांना प्रेरणादायी

भागीदारीत टाटांच्या बाजूने निकाल

शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये 18.37 टक्के भागीदारी आहे. रतन टाटा यांच्या जागी पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवले होते. परंतु चार वर्षांनंतर 2016 मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद होते. टाटा समूहानेच टाटा सन्समधील एसपी ग्रुपची हिस्सेदारी खरेदी करण्याची ऑफर दिली होती, ज्यासाठी मिस्त्री कुटुंब तयार नव्हते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले, तेव्हा टाटांच्या बाजूने निकाल लागला होता.

Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ
CM Pramod Sawant|...बोला ‘प्रमोद’जी बोला!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com