King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी

सलग सात वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले राजा महेंद्र यांचा प्रेरणादायी प्रवास
King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी
Published on
Updated on

सलग सात वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले राजा महेंद्र (King Mahendra) यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. राजा महेंद्र यांचा जन्म 1940 मध्ये जहानाबाद जिल्ह्यातील गोविंद गंज येथे झाला. राजा महेंद्र यांनी पाटणा महाविद्यालयातून अर्थशास्त्रात विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर काही काही दिवस केले.

लहानपणी राजा महेंद्रची परिस्थिती फारच बिकट होती आणि कधी कधी त्यांच्या घरात खाण्यापिण्याचे देखील पंचायत असायची. राजा महेंद्र यांनी मुंबईतील एका फार्मा कंपनीत काही वर्षे काम केले आणि त्यानंतर वयाच्या 31 व्या वर्षी त्यांनी 'अरिस्टो फार्मा' (Aristo Pharma) ही कंपनी स्थापन केली. राजा महेंद्रचे वडील वासुदेव सिंह हे एक सामान्य शेतकरी होते.

King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी
Nitesh Rane: हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी विवाहसंस्थांचे प्रोत्साहन, नितेश राणेंचा आरोप

1980 मध्ये राजा महेंद्र काँग्रेसच्या तिकिटावर जहानाबादमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1985 मध्ये पहिल्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. राजा महेंद्र याआधी काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयू (Congress, RJD, JDU) या पक्षांमध्येही होते.

राजा महेंद्र यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले. राजा महेंद्र 7000 कोटींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. राजा महेंद्र यांनी अरिस्टो फार्मा नंतर मॅप्रा नावाची दुसरी कंपनीही सुरू केली. राज्यसभेत बिहारचे प्रतिनिधित्व करणारे राजा महेंद्र हे राज्यसभेतील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक होते. किंग महेंद्र यांची फार्मास्युटिकल कंपनी अरिस्टो फार्मा देशातील टॉप टेन फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.

King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी
बॅसिलिका ऑफ बॉम जिझस महिनाभरासाठी राहणार बंद

राजा महेंद्र हे सुमारे 4000 कोटी रुपयांच्या जंगम आणि 3000 हजार कोटी स्थावर मालमत्तेचे मालक होते. अरिस्टो फार्मा या देशातील प्रसिद्ध औषध कंपनीचे मालक राजा महेंद्र यांचा व्यवसाय देश-विदेशात पसरला होता. त्यांच्या मालमत्तेबाबतही अनेक वाद कोर्टात सुरू होते.

भारताव्यतिरिक्त महेंद्र यांचा व्यवसाय व्हिएतनाम, आफ्रिका, श्रीलंका, म्यानमार आणि युरोपीय देशांमध्ये पसरलेला आहे. राजा महेंद्र हे बिहारच्या प्रमुख व्यक्तींपैकी एक मानले जायचे. राजा महेंद्रने मुंबईत जाऊन इतके कष्ट केले की कोट्यवधी रुपयांची कंपनी उभी केली. महेंद्र यांचा जीवनप्रवास अनेक तरूणांसाठी प्रेरणादायी असा आहे.

King Mahendra: लहानपणी होती खायची पंचायत, उभी केली करोडोंची कंपनी
Cyrus Mistry: उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू, पालघर जिल्हा अधीक्षकांची माहिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com