Cyrus Mistry: शापूरजी कुटुंबासाठी 2022 ठरले दुःस्वप्न, मिस्त्रींच्या आधी या दिग्गजाने...

सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने दुहेरी धक्का बसला आहे.
Cyrus Mistry
Cyrus MistryDainik Gomantak

Cyrus Mistry Car Accident: अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता असलेल्या 157 वर्ष जुन्या शापूरजी पालोनजी (SP) समूहाचा सर्वात तरुण उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने दुहेरी धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी, जुलैच्या अखेरीस सायरस यांचे वडील आणि समूहाचे अध्यक्ष पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे निधन झाले होते. सुमारे $30 अब्ज संपत्ती असलेल्या या समूहाची टाटा समूहात 18.6 टक्के भागीदारी आहे. लिटिलवुड पॅलोनजी अँड कंपनीची स्थापना 1865 मध्ये 'वरिष्ठ' पालोनजी मिस्त्री (Great-grandfather of Cyrus) यांनी केली होती. सायरस यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे 28 जून 2022 रोजी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांना 'फँटम ऑफ बॉम्बे हाऊस' म्हणूनही ओळखले जात होते.

$30 अब्ज मालमत्ता

ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार, 2022 मध्ये एसपी ग्रुपची एकूण संपत्ती सुमारे $30 अब्ज इतकी आहे. 2012 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून अचानक उदयास आलेल्या सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर जिल्ह्यात कार अपघातात मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते.

Cyrus Mistry
Cyrus Mistry जीवन परिचय! शिक्षण, व्यवसाय, संपत्ती आणि कुटुंबाची माहिती

त्यांची जागा रतन टाटा यांनी घेतली

जन्माने आयरिश नागरिक आणि शापूरजी पालोनजी समूहाचे वारस, मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समूहाच्या कंपन्यांचे प्रमुख होते, जेव्हा त्यांची वयाच्या 44 व्या वर्षी 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. एवढ्या लहान वयात त्यांनी टाटा समूहाचे (Tata Group) प्रमुख म्हणून रतन टाटा यांची जागा घेतली होती. टाटा समूहाची प्रातिनिधिक कंपनी असलेल्या टाटा सन्सची सूत्रे हाती घेण्यास मिस्त्री नाखूष असल्याची चर्चा होती, परंतु खुद्द रतन टाटा यांनी त्यांना हे आव्हान स्वीकारण्यास राजी केले होते.

4 वर्षे पदावर राहिले

त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केले आणि ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांना अचानक पदावरुन हटवण्यात आले. अंतर्गत मतभेदानंतर मिस्त्री यांना केवळ अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले नाही, तर रतन टाटा (Ratan Tata) यांनी स्वतः काही काळ अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. नंतर एन. चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात आले.

Cyrus Mistry
Cyrus Mistry एक यशस्वी उद्योजक ते टाटामधील वादग्रस्त कार्यकाळ

प्रकरण कोर्टात पोहोचले

पालोनजी मिस्त्रीही त्यावेळी सायरस यांना मदत करु शकले नाहीत. सायरस यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळावर गंभीर आरोप केले होते. मात्र या प्रकरणाला तीव्र वळण मिळाले जेव्हा सायरस मिस्त्री यांनी त्यांच्या अध्यक्षपदावरुन बडतर्फीला न्यायालयात आव्हान दिले. टाटा सन्सचे संचालक मंडळ काही महिन्यांपूर्वीपर्यंत माझ्या कामाचे कौतुक करत होते, मात्र अचानक मला काढून टाकण्याचे कारण सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांना अचानक काढून टाकण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com