मोबाइल बनवणाऱ्या कंपनीच्या EV कारचे अनावरण, 5 मुद्द्यांत जाणून घ्या MS11ची खासियत

Xiaomi EV: लॉन्च केल्यानंतर, Xiaomi Modena ची किंमत देशांतर्गत बाजारात 200,000 युआन ($27,400) (अंदाजे 23 लाख) असू शकते.
Xiaomi EV Car Xiaomi SU7 and SU7 Max models
Xiaomi EV Car Xiaomi SU7 and SU7 Max modelsLei Jun, X.
Published on
Updated on

Chinese smartphone maker Xiaomi recently unveiled its first electric car. The company has introduced Xiaomi SU7 and SU7 Max models:

स्मार्टफोन निर्माती करणारी चीनी कंपनीने Xiaomi ने नुकतेच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले. कंपनीने Xiaomi SU7 आणि SU7 Max मॉडेल्स सादर केली आहे. या इलेक्ट्रिक वाहनांना MS11 असे कोडनेम दिले आहे. तर चीनमधील स्थानिक मीडिया रिपोर्टर्स याला Xiaomi Modena म्हणत आहेत.

कंपनीने असेही सांगितले की, त्यांना जगातील टॉप 5 ऑटोमेकर बनायचे आहे. कंपनीने दोन्ही कारच्या बिल्ड क्वालिटीवर खूप काम केले आहे. तसेच, हे Xiaomi HyperEngine V6/V6s सह 21000rpm याचा वापर करण्यात आला आहे.

येत्या एक-दोन महिन्यांत Xiaomi ला चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून (MIIT) मंजुरी मिळेल. ही मंजुरी मिळाल्यानंतर ते आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री सुरू करू शकतील.

किंमत

लॉन्च केल्यानंतर, Xiaomi Modena ची किंमत देशांतर्गत बाजारात 200,000 युआन ($27,400) (अंदाजे 23 लाख) असू शकते. या सुरुवातीच्या किमतीसह, Xiaomi Modena इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडेल 3 आणि BYD सील सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

कारच्या लीक झालेल्या फोटोंनुसार, तिच्या बाह्य डिझाइनमध्ये मोठ्या एलईडी हेडलाइट्स आणि तुलनेने साधे फ्रंट बंपर आहेत. Xiaomi च्या पहिल्या EV ला फ्लश डोअर हँडल, छतावर बसवलेले LiDAR आणि टेस्ला मॉडेल 3 सारखे पॅनोरामिक काचेचे छप्पर अपेक्षित आहे.

बॅटरी आणि रेंज

इलेक्ट्रिक कारमध्ये 101 kWh ची टर्नरी बॅटरी आणि 800-व्होल्ट इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर असण्याची अपेक्षा आहे. ती एका चार्जवर 800 किलोमीटर किंवा 497 मैलांपर्यंतचे अंतर पार करू शकते. हे Xiao च्या स्वयं-विकसित इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असेल तर तिची बॅटरी CATL आणि BYD कडून घेतली जाईल.

Xiaomi EV Car Xiaomi SU7 and SU7 Max models
एसबीआयसह 'या' तीन बँकांमध्ये पैसा सर्वात सुरक्षित, आरबीआयने जाहीर केली Safest Banks List

टेस्ला, पोर्शपेक्षा वेगाने धावेल Xiaomi SU7

यावेळी Xiaomi चे संस्थापक आणि CEO Lei Jun म्हणाले की, SU7 सेदान कार 'सुपर इलेक्ट्रिक मोटर' तंत्रज्ञानावर आधारित आहे. सुपर इलेक्ट्रिक मोटर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली Xiaomi ची पहिली ई-सेडान कार टेस्ला कार आणि पोर्श ईव्हीपेक्षा जास्त वेगाने धावण्यास सक्षम आहे.

कलर्स

कंपनीने सांगितले की, त्यांची नवीन EV कार तीन रंगांच्या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल त्यामध्ये एक्वा ब्लू, मिनरल ग्रे आणि व्हर्डंट ग्रीन यांचा समावेश आहे.

Xiaomi EV Car Xiaomi SU7 and SU7 Max models
Samsung Galaxy S24 मध्ये AI फिचर! रिअल टाईम कॉल ट्रान्सलेटर, सर्कल सर्चसह 'या' वैशिष्ट्यांनी सुसज्ज

कंपनीचे टार्गेट

"पुढील 15 ते 20 वर्षात कठोर परिश्रम करून, आम्ही जागतिक बाजारपेठेतील पहिल्या पाच ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक बनू. यामुळे चीनच्या ऑटोमोबाईल उद्योगाला बळकटी मिळेल," असे SU7 सादर करण्यासाठी बीजिंगमध्ये आयोजित कार्यक्रमात कंपनीचे सीईओ लेई जू म्हणाले.

अनेक टेक कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायात विविधता आणण्याची योजना आखली आहे. आपल्या स्मार्टफोन्सच्या व्यवसायाव्यतिरिक्त, Xiaomi EV कार विभागात देखील प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीने एका दशकात अंदाजे $10 अब्ज गुंतवण्याची योजना आखली आहे. लेई म्हणाले की, Xiaomi कारची स्वायत्त ड्रायव्हिंग क्षमता या उद्योगात अग्रणी असेल. या गाड्या चीन सरकारच्या मालकीच्या BAIC समूहाच्या बीजिंग कारखान्यात तयार केल्या जातील. या कारखान्याची वार्षिक क्षमता दोन लाख वाहनांची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com