BMW C400gt Scooter: टाटा नेक्सॉन अन् मारुती ब्रेझापेक्षा महागडी स्कूटर तुम्ही बघतली का? जाणून घ्या खासियत अन् शानदार फीचर्स

BMW C 400 GT Price In India: टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा पेक्षाही महागडी स्कूटर तुम्ही पाहिली आहे का? हो, भारतात अशी एक स्कूटर उपलब्ध आहे, जी या दोन्ही कारपेक्षा महाग आहे. ही शानदार स्कूटर बनवणारी कंपनी बीएमडब्ल्यू आहे.
BMW C 400 GT Price In India
BMW C400gt ScooterDainik Gomantak
Published on
Updated on

टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा पेक्षाही महागडी स्कूटर तुम्ही पाहिली आहे का? हो, भारतात अशी एक स्कूटर उपलब्ध आहे, जी या दोन्ही कारपेक्षा महाग आहे. या स्कूटरच्या इंजिनपासून ते त्याच्या टॉप स्पीडपर्यंत, सर्वकाही टॉप क्लास आहे. चला तर मग या शानदार स्कूटरबाबत जाणून घेऊया...

दरम्यान, ही शानदार स्कूटर (Scooter) बनवणारी कंपनी बीएमडब्ल्यू आहे, जी लक्झरी कार बनवण्यासाठी ओळखली जाते. त्यांच्या BMW C 400 GT स्कूटरची भारतात (India) किंमत 11.50 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे, जी टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझापेक्षा जास्त आहे. मारुती ब्रेझाची एक्स-शोरुम किंमत 8.69 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टाटा नेक्सॉनची किंमत 8.99 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.

BMW C 400 GT Price In India
BMW X3 Launched: BMW X3 SUV भारतात लाँच, 'या' खास गोष्टी जाणून घ्या

शक्तिशाली बीएमडब्ल्यू सी 400 जीटी स्कूटर

कंपनी BMW C 400 GT स्कूटरमध्ये 350cc इंजिन देते. ते 34 एचपी पॉवर आणि 35 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरचे मायलेज 28.57 किमी प्रति लिटर आहे. ही स्कूटर फक्त 3.5 सेकंदात 0-100 किमीचा वेग गाठते. याशिवाय, ही स्कूटर सिटी मोबिलिटी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या स्कूटरमध्ये 12 लिटरची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. तसेच, तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोठी विंड स्क्रीन, मोठी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीन आणि 129 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळतो. स्कूटर अगदी किफायतशीर आहे. ही युरो 5+ स्टॅंडर्ड स्कूटर आहे.

BMW C 400 GT Price In India
Tata Punch: नेक्सॉनपेक्षा 2 लाखांनी स्वस्त असणारी 'टाटा पंच' बनली नंबर 1, ब्रेझालाही सोडले मागे; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् बरचं काही

शानदार फीचर्स

दरम्यान, या स्कूटरच्या बूट स्पेसमध्ये एक शानदार फीचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या स्कूटरच्या बूट स्पेसमध्ये एक फ्लॅप आहे. त्यात हेल्मेट ठेवताच, फ्लॅप खाली जातो. यानंतर, हेल्मेट काढून त्याचा फ्लॅप वर केल्याशिवाय स्कूटर सुरु होत नाही. अशाप्रकारे हे स्कूटर चालकाची सुरक्षितता सुनिश्चित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com