Sameer Amunekar
BMW नं भारतात X3 SUV लाँच केलीय. या कारला पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आली आहे. BMW X3 मध्ये नवीन फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नवीन X3 मध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर इंजिन आहे. त्याची केबिन खूपच आलिशान आहे.
BMW X3 ला नवीन डिझाइन देण्यात आलं आहे. यात समोर एक मोठे ग्रिल आहे, ज्यामध्ये आडवे आणि कर्णरेषीय स्लॅट्स असून एलईडी लाईट्स आहेत.
BMW X3 मध्ये रुंद व्हील आर्च आणि 4 व्हील आकाराचे पर्याय देखील आहेत. मागून पाहिल्यावर कार खूपच स्पोर्टी दिसते.
BMW X3 मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसंच इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. यात एसी व्हेंट, इंटरॅक्शन बार आणि ॲम्बियंट लाइटिंग आहे. सेंटर कन्सोलमध्ये कॅमेरा, व्हॉल्यूम, नेव्हिगेशन आणि इतर फंक्शन्ससाठी गिअर नॉब आणि इतर बटणे आहेत.
BMW X3 मध्ये 2.0 -लिटर चार-सिलेंडर इंजिन आहे. त्याचं पेट्रोल इंजिन 206 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करतं. तर डिझेल इंजिन 197 बीएचपीची पॉवर आणि ४०० एनएम टॉर्क जनरेट करतं.
BMW X3 चं पेट्रोल व्हर्जन 75,80,000 रुपये एक्स-शोरूम किमतीत आणि डिझेल व्हर्जन 77,80,000 रुपये किंमतीत लाँच करण्यात आलं आहे.