नोकियाचा 'हा' मोबाइल करणार धमाल; तब्बल 18 दिवस टिकणार चार्जिंग आणि..

नोकिया 2760 फ्लिप फोनची वैशिष्ट्ये जाणून घ्या
Latest Nokia smartphone launch News | Latest Nokia smartphone News | Latest Tech News in Marathi
Latest Nokia smartphone launch News | Latest Nokia smartphone News | Latest Tech News in Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

मोबाईल फोन्सच्या जगात नोकिया आता तितका प्रसिद्ध नसला तरी वेळोवेळी स्वस्त आणि आलिशान फोन बाजारात आणताना दिसत आहे. नुकताच नोकिया ने फोल्डेबल फोन नोकिया 2760 Flip लॉन्च केला आहे. या फोनची किंमत खूपच कमी आहे आणि यात ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे. (Latest Tech News in Marathi)

HMD ग्लोबल सतत नवीन नोकिया फोन लॉन्च करत आहे. एचएमडी ग्लोबल नवीन लूकमध्ये जुन्या मॉडेल्सना पुन्हा बाजारात आणत आहे. यावेळी नोकिया 2760 फीचर लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत US मध्ये जवळपास 1,500 रुपये. नोकियाच्या या फोनमध्ये 2.8-इंचाचा डिस्प्ले, 5MP कॅमेरा आणि मजबूत बॅटरी आहे. (Nokia smartphone News Updates in Marathi)

Latest Nokia smartphone launch News | Latest Nokia smartphone News | Latest Tech News in Marathi
फ्लॅटमधून कोटींची रोकड जप्त, नोटांचे ढिगारे पाहून पोलीस चक्रावले

नोकिया 2760 फ्लिप फोनची वैशिष्ट्ये

नोकियाच्या या फोनमध्ये 2.83-इंचाची LCD स्क्रीन आणि 1.77-इंचाची बाह्य स्क्रीन आहे. यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 4GB इंटरनल मेमरी आणि 512 MB RAM आहे.

नोकिया 2760 फ्लिपमध्ये सेन्सर फ्लॅशसह 5 मेगापिक्सेल कॅमेरा, (Camera) कॅल्क्युलेटर, अलार्म आणि वेब-ब्राउझिंग सारखी मूलभूत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ईमेल, वेब ब्राउझिंग आणि इतर फीचर्ससह फोनमध्ये अनेक अॅप्स देखील देण्यात आले आहेत. फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅप सारखे अॅप्स प्रीलोड केलेले आहेत. तसेच, 4G इंटरनेट (Internet) देखील आहे.

Latest Nokia smartphone launch News | Latest Nokia smartphone News | Latest Tech News in Marathi
युक्रेनमधून आणखी चार गोमंतकीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप

बॅटरीची वैशिष्ट्ये

नोकियाच्या या फोनमध्ये 1450 mAh ची डिटेचेबल बॅटरी आहे. बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर नोकियाचा दावा आहे की एकदा चार्जिंग केल्यावर या फोनला 18 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो. हा फोन 7 तासांच्या टॉक टाइमसह येतो.

फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, 3.5 मिमी हेडफोन जॅक, सी-टाइप सब कनेक्शन, वाय-फाय सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com