100 किमी बॅटरी बॅकअपसह, 'या' 10 इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये

टॉप 10 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
 electric scooters under 50000 ampere reo komaki xone avon scoot hero electric optima la komaki xgt km
electric scooters under 50000 ampere reo komaki xone avon scoot hero electric optima la komaki xgt kmDainik Gomantak
Published on
Updated on

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत आणि अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या आहेत. जर तुम्हीही आजकाल इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 50,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या टॉप 10 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये तसेच बॅटरी बॅकअप बद्दल जाणून घ्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यापैकी अनेक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंत धावू शकतात आणि लूक-फिचरमध्येही उत्तम आहेत.

एका चार्जवर 100 किमी

Raftaar Electrica इलेक्ट्रिक स्कूटर हा तुमच्यासाठी 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणि बॅटरी बॅकअप सह एक उत्तम पर्याय आहे, ज्याची किंमत 48,540 रुपये आहे आणि 100 किमी पर्यंत बॅटरी बॅकअप आहे.

 electric scooters under 50000 ampere reo komaki xone avon scoot hero electric optima la komaki xgt km
exit poll results 2022 : गोव्यात पुन्हा भाजपचे सरकार होणार स्थापन

कबीरा मोबिलिटी कोलेजिओ इलेक्ट्रिक (Electric) स्कूटर 45,990 रुपयांना मिळेल आणि त्याची बॅटरी बॅकअप 100 KM पर्यंत आहे. तुमच्यासाठी Komaki XGT KM हा देखील एक चांगला पर्याय आहे, ज्याची किंमत 42,500 रुपये आहे आणि एका चार्जवर 85 किमी पर्यंत धावू शकते.

स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

तुमच्यासाठी कमी किमतीत Ampere Reo इलेक्ट्रिक स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे, ज्याची किंमत 43,490 रुपयांपासून सुरू होते आणि त्याची बॅटरी बॅकअप 60 किमी पर्यंत आहे. हीरो इलेक्ट्रिक, भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी आहे, कमी किमतीत अनेक छान पर्याय सादर केले आहेत, ज्यामध्ये Hero Electric Optima LA ची किंमत 44,990 रुपये (एक्स-शोरूम) आहे. यानंतर, सर्वात लोकप्रिय कंपनी Komaki ने कमी किमतीत चांगली बॅटरी रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील सादर केली आहे, ज्यामध्ये Komaki Xone ची किंमत 45,000 रुपये आहे आणि ती एका चार्जवर 85 किमी पर्यंत धावू शकते.

 electric scooters under 50000 ampere reo komaki xone avon scoot hero electric optima la komaki xgt km
'या' शेतीपासून लाखोंची कमाई, सरकार देतंय अनुदान

कोमाकी आणि अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटर

Komaki X2 Vouge हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्याची किंमत 47,000 रुपये आहे आणि एका चार्जवर 85 किमी धावू शकते. यानंतर, Avon E Scoot देखील योग्य इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची किंमत 45,000 रुपये आहे आणि बॅटरीची रेंज 65 किमी प्रति चार्ज आहे. Ampere Magnus Pro ची किंमत 49,999 रुपयांपासून सुरू होते आणि एका चार्जवर 75 किमी धावते. Hero Electric Dash ची किंमत 50,000 रुपये आहे आणि 60 किमी पर्यंत बॅटरी बॅकअप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com