Manish Jadhav
Hyundai ने Exeter ची नाईट एडिशन लॉन्च केली आहे. या स्पेशल व्हेरियंटमध्ये काही खास स्टाइल्स अपडेट करण्यात आल्या आहेत.
Exeter लाँच होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने नवीन एडिशन लाँच केली आहे. यात सर्व ब्लॅक थीम आणि रेड हायलाइट्स आहेत. एक्सेटर नाईट एडिशन SX आणि SX (O) कनेक्ट व्हेरियंटवर आधारित आहे.
एक्सटीरियर पेंटची स्कीम बदलली आहे. हे ब्लॅक पेंट, फ्रंट बंपर, ब्रेक कॅलिपरसह रेड हायलाइट्स येते. याशिवाय, कारला ब्लॅक फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स, ब्लॅक बॅज आणि ब्लॅक अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
नाईट एडिशनच्या इंटीरियरमध्ये ब्लॅक थीम देण्यात आली आहे. रेड टच जोडले गेले आहेत, जसे की रेड फूटवेल लाइटिंग, सीट्स आणि फ्लोअर मॅट्स. याशिवाय ब्लक कलरचे डोअर हँडल आणि स्टेअरिंग, मेटल स्कफ यांचाही समावेश करण्यात आला आहे.
एक्सेटर नाईट एडिशनमध्ये 1.2 लिटर, 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 83hp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.
Exeter Night Edition ची किंमत 8.38 लाख रुपयांपासून सुरु होते. ही 8 ऑप्शनमध्ये खरेदी केली जाऊ शकती.