March Bank Holidays: मार्चमध्ये बॅंक व्यवहार होऊ शकतात ठप्प?

तब्बल 13 दिवस बँका राहतील बंद; रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 साठी बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Bank Holidays
Bank Holidays Dainik Gomantak
Published on
Updated on

Bank Holidays News: मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आधी सुट्ट्यांची यादी जाणून घ्या. मार्च महिन्यात जवळपास अर्धामहिना सुट्ट्या आहेत. तब्बल 13 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 साठी बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. (RBI releases list of bank holidays for March)

Bank Holidays
LIC IPO: LIC मध्ये करता येणार 20 टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक

मार्चमध्ये, एकूण 13 दिवसांच्या बँकांच्या (Bank Holidays) सुट्ट्यांपैकी संपुर्ण देशभरात 13 दिवस बँका (Bank) बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

मार्च 2022 मध्ये बँक सुट्ट्या

मार्च 2022 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका कधी बंद होतील? त्यामुळे पुढील महिन्यातील सुट्टीच्या यादीच्या आधारे तुम्ही तुमची बँकेशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

  • 1 मार्च (महाशिवरात्री) - आगरतळा, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि वगळता इतर ठिकाणी बँका बंद.

  • 3 मार्च (लोसर उत्सव) - गंगटोकमध्ये बँक बंद

  • 4 मार्च (चपचार कुट महोत्सव) - आयझॉलमध्ये बँक बंद

  • 6 मार्च (रविवार) - साप्ताहिक सुट्टी

  • 12 मार्च (शनिवार) - महिन्याचा दुसरा शनिवार

  • 13 मार्च (रविवार) - साप्ताहिक सुट्टी

  • 17 मार्च (होळी उत्सव) - डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांचीमध्ये बँका बंद

  • 18 मार्च (होळी ) - बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद आहेत.

  • 19 मार्च (होळी ) - भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँका बंद

  • 20 मार्च (रविवार) - साप्ताहिक सुट्टी

  • 22 मार्च (बिहार दिवस) - पाटण्यात बँक बंद

  • 26 मार्च (शनिवार) - महिन्याचा चौथा शनिवार

  • 27 मार्च (रविवार) - साप्ताहिक सुट्टी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com