Bank Strikes: उद्यापासून देशातील बँका राहणार सलग 4 दिवस बंद, महत्त्वाचे काम आजच करा!

State Bank of India: बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच करुन घ्या. अन्यथा नंतर तुम्हाला बँकेशी संबंधित कामासाठी बराच वेळ थांबावे लागू शकते.
Bank Strikes
Bank StrikesDainik Gomanatak

Bank Strikes: बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते आजच करुन घ्या. अन्यथा नंतर तुम्हाला बँकेशी संबंधित कामासाठी बराच वेळ थांबावे लागू शकते.

वास्तविक, 28 जानेवारीला चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. यानंतर सोमवार आणि मंगळवारी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारीला बँकांकडून संपाची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच, बँकांशी संबंधित कामासाठी आज नंतर 1 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

संपामुळे कामावर परिणाम होण्याची शक्यता

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 30 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. हे पाहता, भारतीय स्टेट बँक (SBI) ने ग्राहकांना कळवले आहे की, युनियन फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने 30 आणि 31 जानेवारी रोजी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बँक (Bank) संपामुळे कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

Bank Strikes
Bank Holidays: जानेवारीत 13 दिवस राहणार बँका बंद; यादी जाणून घ्या, मग नियोजन करा

SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) कडून सांगण्यात आले की, UFBU ने संपाबाबत माहिती दिली आहे.

Bank Strikes
Bank Holidays November 2022: नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बॅंका, सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

तसेच, बँक संघटनांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याचा प्रस्ताव दिला आहे.

संपाच्या दिवशी कोणत्याही ग्राहकाला (Customer) कोणतीही अडचण येऊ नये यासाठी एसबीआयने आपल्या शाखेत आवश्यक काम केले जावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. संपामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com