Bank Holidays: जानेवारीत 13 दिवस राहणार बँका बंद; यादी जाणून घ्या, मग नियोजन करा

काही सुट्ट्या ह्या ठराविक राज्ये किंवा प्रदेशांमध्येच असतील.
Bank Holidays
Bank Holidays Dainik Gomantak

Bank Holidays: नवीन वर्षांत जानेवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी RBI ने जाहीर केली आहे. RBI च्या यादीनुसार जानेवारीत 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. तसेच, काही सुट्ट्या ह्या ठराविक राज्ये किंवा प्रदेशांमध्येच असतील. रविवारी पाच दिवस आणि शनिवारच्या दोन दिवस सुट्या असतील.

(List Of Bank Holidays In January 2023)

Bank Holidays
Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर डागली 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे; संपूर्ण युक्रेन अंधारात

एक जानेवारी हा रविवार आहे. मिझोराममध्ये 2 जानेवारीला, 3-4 जानेवारीला इंफाळच्या विविध भागात बँका बंद राहतील. 8 जानेवारीला रविवार आणि 14 जानेवारीला दुसरा शनिवार सुट्टी आहे. तर, 15 जानेवारी रविवार आहे. 22 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहतील. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी काही भाग वगळता बँका बंद राहतील. 28 जानेवारी हा चौथा शनिवार आणि 29 जानेवारी रविवार आहे.

Bank Holidays
Colvale Fire: 350 बंब संपले तरी आग विझता विझेना, 28 तासानंतरही भंगारअड्डा धुमसतोय

दरम्यान, बँक सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशभरातील बँकांना 1 जानेवारी 2023 पर्यंत लॉकरसेवा वापरत असलेल्या विद्यमान ग्राहकांसोबत लॉकर कराराचे नूतनीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे बँकेच्या लॉकर वापराबाबत अनिवार्य नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. ग्राहकांना 31 डिसेंबरपूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com