Bank Holidays November 2022: नोव्हेंबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बॅंका, सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

Bank Holidays November 2022: नोव्हेंबर महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.
Bank Holiday
Bank HolidayDainik Gomantak

Bank Holidays In November 2022: नोव्हेंबर महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत.

आरबीआयने सुट्ट्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. (नोव्हेंबर 2022 मध्ये बँक सुट्ट्या) यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या आहेत, ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत.

Bank Holiday
Bank Holidays in October: ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बँका राहणार बंद

नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार

1 नोव्हेंबर 2022 - कन्नड राज्योत्सव/कुट - बंगळुरु आणि इंफाळमध्ये बँका बंद

6 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

8 नोव्हेंबर 2022 - गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वांगला उत्सव – आगरतळा, बंगलोर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम वगळता बँका बंद

11 नोव्हेंबर 2022 - कनकदास जयंती / वांगला उत्सव - बंगळुरु आणि शिलाँगमध्ये बँका बंद

Bank Holiday
Bank Holidays October 2022: ऑक्टोबरमध्ये बँका राहणार 21 दिवस बंद, फटाफट कामे उरकून घ्या

12 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

13 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

20 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

23 नोव्हेंबर 2022 - सेंग कुत्सानेम- शिलॉन्ग येथे बँक बंद

26 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

27 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com