KBC मध्ये 25 लाखांची लॉटरी, तुम्हालाही आलाय का मेसेज?
KBC Lottery Scam: देशात डिजिटल क्रांती झाल्यानंतर ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे सायबर ठग लोकांची फसवणूक करण्याचे नवनवीन मार्ग तयार करतात. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे, ज्यामध्ये युजर्सला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले जाते आहे.
काय असतो SMS
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, संबधित ग्राहकांना 25 लाखांची लॉटरी लागली आहे. हा SMS प्रसिद्ध टिव्ही शो कौन बनेगा करोडपती (KBC) शी जोडला जातो आहे. परंतु हा संदेश पूर्णपणे खोटा आहे, हे ग्राहकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे.
पीआयबीने केले अलर्ट
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून ग्राहकांना जागृक केले आहे. "फसवणूक करणाऱ्यांकडून फोन कॉल, ई-मेल आणि मेसेजवर खोटे दावे केले जात आहेत. ग्राहकांना 25,00,000 रूपयांची लॉटरी जिंकली आहे. असा संदेश येतो. अशा लॉटरी घोटाळ्यांपासून सावध रहा. कॉल, मेल आणि संदेशांवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका." असे पीआयबीने म्हटले आहे.
ही फसवणूक कशी टाळायची
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने काही स्टेप्स सांगितल्या आहेत. ज्यांना फॉलो करून तुम्ही या प्रकारची ऑनलाइन फसवणूक टाळू शकता.
तुम्हाला येणारा लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचा कोणताही संदेश पूर्णपणे खोटा असतो. हे आधी समजून घ्या.
असे संदेश नीट पाहिल्यास त्यात तुम्हाला भाषेच्या चुका आढळून येणार.
ऑनलाइन माध्यमातून असे खोटे SMS आणि कॉल करून तुम्हाला इमोशनली इनव्हॉल करतात. अशावेळी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणे, पर्यायी माध्यमांद्वारे माहितीची पडताळणी करणे गरजेचे आहे.
लॉटरी जिंकल्यानंतर कुठलीही रक्कम भरावी लागत नाही, मात्र या कॉल SMSद्वारे येणाऱ्या लॉटरीमध्ये तुम्हाला भावनिकरित्या भुरळ घालून काही रक्कम गुंतवण्यास सांगताच तुम्ही सावध होणं गरजेच आहे.
तुमच्यासोबत बोलणारा कॉलर स्वत:ची पुर्ण माहिती देत नाही. तो आपली गोपनीयता राखण्यावर भर देतो, तेव्हा तुम्हीही सावध होवून आपली कोणतीही माहिती त्याच्या सोबत शेअर करू नका.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.