नॅशनल पेमेंटस कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने माहिती दिली आहे की नेपाळ हा भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा पाहिला देश बनला आहे, ज्यामुळे शेजारील देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात लक्षणीय मदत होईल. NPCI इंटरनॅशनल पेमेंटस लिमिटेड, NPCI ची आंतरराष्ट्रीय शाखाने नेपाळमध्ये सेवा देण्यासाठी गेटवे पेमेंटस सर्व्हिस (GPS) आणि मनम इन्फो टेक यांच्याशी हातमिळवणी केली आहे. GPS नेपाळमधील अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे. मनम इन्फोटेक नेपाळमध्ये युनिफाईड पेमेंटस इंटरफेस (UPI) लागू करेल. NPCI ने एका निवेदनात म्हणटले आहे की या युतीमुळे नेपाळमधील (Nepal) लोकांच्या सोयी वाढतील आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल.
* UPI म्हणजे काय?
UPI ही एक बँकिंग प्रणाली आहे. त्याच्या मदतीने पेमेंट अॅपवर पैशांचे व्यवहार करता येतात. UPI च्या मदतीने तुम्ही कुठूनही, कोणत्याही खात्यात पैसे (Money) ट्रान्सफर करू शकता. याचा वापर तुम्ही मोबाइलद्वारे (Mobile) देखील करू शकता. हे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ने विकसित केले आहे. त्यांचे नियंत्रण रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशनच्या हातात आहे. सध्या तुम्ही BHIM, Phone Pay, Google Pay, Mobikwik, paytm सारख्या अनेक अॅप्सच्या मदतीने UPI वापरु शकता.
* इंटरनेटशिवाय UPIलाइटची चालू तयारी
NPCI सध्या UPI लाइटवर काम करत आहे. UPI lite च्या मदतीने इंटरनेट (Internet) कनेक्शन नसतानाही पेमेंट करता येते. याचा फायदा देशातील ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकाना होणार आहे, जिथे इंटरनेट नीट चालवता येत नाही. UPI Lite द्वारे कोणतीही व्यक्ती फीचर फोनवरून डिजिटल पेमेंट करू शकणार आहे. तज्ञांच्या मते, UPI Lite चा वापर ग्रामीण भागात 200 रुपयांपेक्षा कमी पेमेंटसाठी केला जाईल. आरबीआयने (RBI) 5 जानेवारीला इंटरनेट कनेक्शनशिवाय 200 रुपयापर्यंतच्या डिजिटल पेमेंटला आधीच परवानगी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.